नवी दिल्ली : माजी नेमबाज आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांची आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या (ओसीए) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आशियाई स्तरावर क्रीडा क्षेत्रात इतके मोठे पद भूषविणारे रणधीर सिंग हे पहिले भारतीय ठरले आहेत.
ओसीए म्हणजेच ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या ४४व्या महासभेदरम्यान रविवारी हा निर्णय घेण्यात आला. नेमबाज म्हणून पाच वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले रणधीर सिंग ‘ओसीए’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेव उमेदवार होते. त्यामुळे त्यांची निवड एकमताने झाली. त्यांचा कार्यकाळ २०२४ ते २०२८ असा चार वर्षांसाठी असेल. क्रीडा प्रशासनावर रणधीर यांची मजबूत पकड दिसून आली. त्यांच्या नेमबाजीतील अचूकता त्यांच्या क्रीडा निर्णयात दिसून आली. म्हणूनच ७७ वर्षीय रणधीर यांच्यावर २०२१ पासून कार्यवाहक अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.