क्रीडा

India squad for T20 World Cup : २०-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ जाहीर ; पंत-कार्तिक दोघांनाही संधी

जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल तंदुरुस्त असल्याने त्यांचे संघात पुनरागमन झाले असून आवेश खानला मात्र वगळण्यात आले आहे

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या १५ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात अपेक्षेप्रमाणे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही विकेटकीपर-फलंदाजांना संधी देण्यात आली असून दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाच्या जागी डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे.

नुकताच झालेल्या आशिया चषकातील बहुतांश खेळाडू या संघातही कायम राखण्यात आले आहेत. जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल तंदुरुस्त असल्याने त्यांचे संघात पुनरागमन झाले असून आवेश खानला मात्र वगळण्यात आले आहे. तसेच सलामीसाठी तिसरा पर्याय म्हणून दीपक हूडाची निवड करण्यात आल्याचे समजते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० मालिकेसाठीसुद्धा संघ घोषित केला.

१६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान विश्वचषक रंगणार असून त्यापूर्वी भारतीय संघ २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया, तर २८ सप्टेंबरपासून आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. दरम्यान, मोहम्मद शमीला विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंत ठेवण्यात आले असले तरी ऑस्ट्रेलिया व आफ्रिकेविरुद्ध त्याला मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, दीपक हूडा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

विश्वचषकातील भारताचे सामने

वि. पाकिस्तान - २३ ऑक्टोबर

वि. पात्र संघ १ - २७ ऑक्टोबर

वि. दक्षिण आफ्रिका - ३० ऑक्टोबर

वि. बांगलादेश - २ नोव्हेंबर

वि. पात्र संघ २ - ६ नोव्हेंबर

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक