सिडनी येथे आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला टी-२० सामना; मोलिन्यूक्सकडे कांगारूंचे नेतृत्व Photo : X
क्रीडा

आता भारतीय महिला संघाची टी-२० विश्वचषकासाठी तयारी; सिडनी येथे आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला टी-२० सामना; मोलिन्यूक्सकडे कांगारूंचे नेतृत्व

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ रविवारपासून टी-२० विश्वचषकाच्या तयारीला प्रारंभकरणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना रविवारी सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. सोफी मोलिन्यूक्स प्रथमच या मालिकेद्वारे ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे.

Swapnil S

सिडनी : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ रविवारपासून टी-२० विश्वचषकाच्या तयारीला प्रारंभकरणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना रविवारी सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. सोफी मोलिन्यूक्स प्रथमच या मालिकेद्वारे ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात भारताने मुंबईत ऐतिहासिक महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद मिळवले. त्यानंतर श्रीलंकेला भारताने टी-२० मालिकेत धूळ चारली. तसेच काही आठवड्यांपूर्वीच महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचे चौथे पर्व उत्साहात पार पडले. स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदा डब्ल्यूपीएलचे दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची किमया साधली. आता जून-जुलै महिन्यात इंग्लंड येथे टी-२० विश्वचषक रंगणार असल्याने भारतीय महिला संघ तयारीला लागला आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकूण ३ टी-२०, ३ एकदिवसीय व १ कसोटी सामन्याचा समावेश आहे. १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत टी-२० सामने होतील, त्यानंतर २४ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान ३ एकदिवसीय सामने खेळवले जातील. मग ६ ते ९ मार्च या कालावधीत उभय संघांत एकमेव डे-नाईट टेस्ट म्हणजेच गुलाबी चेंडूने प्रकाशझोतातील कसोटी पर्थ स्टेडियमवर खेळवण्यात येईल. हा दौरा संपल्यानंतर एप्रिलमध्ये भारतीय संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे.

टी-२० संघात स्मृती, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, रिचा घोष असे फलंदाज आहेत. गोलंदाजीत क्रांती गौड, रेणुका सिंग यांच्यावर भारताची भिस्त असेल. भारती फुलमाळीचे २०१९नंतर संघात पुनरागमन झाले आहे. राधा यादव या संघाचा भाग नाही.

दुसरीकडे एलिसा हिलीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदासाठी एलिस पेरी, ताहिला मॅकग्रा, अॅनाबेल सदरलँड, अॅश्लेघ गार्डनर यांसारखी नावे शर्यतीत होती. मात्र सोफी मोलिन्यूक्सकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता मोलिन्यूक्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियातील नव्या पर्वाला प्रारंभ होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी १.४५ वाजता सर्व टी-२० लढती सुरू होणार असून स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

  • पहिली टी-२० लढत : १५ फेब्रुवारी, सिडनी (१.४५ वाजता)

  • दुसरी टी-२० लढत : १९ फेब्रुवारी, कॅनबरा (१.४५ वाजता)

  • तिसरी टी-२० लढत : २१ फेब्रुवारी, अॅडलेड (१.४५ वाजता)

  • पहिला एकदिवसीय सामना : २४ फेब्रुवारी, ब्रिस्बेन (९.२० वाजता)

  • दुसरा एकदिवसीय सामना : २७ फेब्रुवारी, होबार्ट (९.२० वाजता)

  • तिसरा एकदिवसीय सामना १ मार्च, होबार्ट (९.२० वाजता)

  • एकमेव कसोटी लढत : ६ ते ९ मार्च, पर्थ (दिवस-रात्र सामना)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके