एक्स @KKRiders
क्रीडा

IPL : मुंबईकर अजिंक्य रहाणे KKR चा कर्णधार; म्हणाला - "आयपीएलमधील सर्वात यशस्वी..."

मुंबईसह भारताचा प्रतिभावान आणि मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणेची इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली आहे.

Swapnil S

कोलकाता : मुंबईसह भारताचा प्रतिभावान आणि मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणेची इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच डावखुरा अष्टपैलू वेंकटेश अय्यरकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

"आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक केकेआरचे नेतृत्व करण्यासाठी निवडले जाणे हा मी माझा सन्मान समजतो. आमच्याकडे उत्कृष्ट आणि संतुलित संघ आहे. मी सर्वांसोबत काम करण्यास उत्सुक आहे आणि विजेतेपद टिकवण्याचे आव्हान स्वीकारण्यास तयार आहे," अशी प्रतिक्रिया रहाणेने सोमवारी कर्णधारपदी अधिकृत घोषणा झाल्यानंतर दिली.

२२ मार्चपासून आयपीएलचे १८वे पर्व सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने सध्या भारतीय संघाचा भाग नसलेले सर्व खेळाडू आपापल्या आयपीएल संघाच्या सराव शिबिरात दाखल झाले आहेत. डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव झाल्यापासून कोलकाताचा कर्णधार कोण बनणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते. अखेर सोमवारी कोलकाताचे सीईओ वेंकी मैसूर यांनी याविषयी घोषणा केली.

गतवर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएल जिंकली होती. मात्र श्रेयसला संघात कायम न राखल्यावर कोलकाताने १.५ कोटींमध्ये रहाणेला संघात स्थान दिले. ३६ वर्षीय रहाणे गतवर्षी चेन्नईकडून खेळत होता. यापूर्वी २०२२मध्ये कोलकाताचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईने सय्यद मुश्ताक अली या देशांतर्गत टी-२० स्पर्धेचे जेतेपद मिळवले. त्या स्पर्धेत रहाणेने ८ सामन्यांत सर्वाधिक ४६९ धावा फटकावल्या होत्या. तसेच वेंकटेशला कोलकाताने २३.७५ कोटींमध्ये खरेदी केले होते. मात्र रहाणे अनुभवी असल्याने त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी