क्रीडा

भारतीय महिलांनी संधी गमावली! ऑलिम्पिक पात्रतेच्या उपांत्य सामन्यात जर्मनीकडून सडन डेथमध्ये पराभव

रांची येथील जयपाल सिंह स्टेडियमवर झालेल्या या उपांत्य सामन्यात भारताने सुरुवातीपासून चेंडूवर नियंत्रण मिळवले.

Swapnil S

रांची : भारतीय महिला हॉकी संघाने गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिक २०२४चे स्थान पक्के करण्याची सुवर्णसंधी गमावली. एफआयएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारताला जर्मनीकडून सडन डेथमध्ये २-२ (३-४) असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता शनिवारी जपानविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात विजय मिळवून ऑलिम्पिक पात्रता मिळवण्याची अखेरची संधी भारताकडे शिल्लक आहे.

रांची येथील जयपाल सिंह स्टेडियमवर झालेल्या या उपांत्य सामन्यात भारताने सुरुवातीपासून चेंडूवर नियंत्रण मिळवले. भारतासाठी दीपिका कुमारीने १५व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला. मात्र त्यानंतर जर्मनीच्या स्टेफनहोस्ट शार्लेटने ३०व्या व ५७व्या मिनिटाला गोल नोंदवून २-१ अशी आघाडी मिळवली. अखेर ५९व्या मिनिटाला इशिका चौधरीने निर्णायक गोल झळकावून भारताला बरोबरी साधून दिली. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताची कर्णधार सविता पुनियाने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघ एकवेळ ३-१ असा आघाडीवर होता. नवनीत कौर व नेहा यांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे सामना सडन डेथमध्ये गेला. तिकडे मग संगीता कुमारी व सोनिका या दोघींना गोल करता आला नाही. जर्मनीच्या सोटँग नोल्टे लिसाने गोल नोंदवून जर्मनीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे भारताच्या तोंडचा घास एकप्रकारे जर्मनीने हिरावला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेने जपानला नमवले. त्यामुळे भारतासमोर शनिवारी जपानचे आव्हान असेल. अमेरिका व जर्मनी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले