क्रीडा

भारताच्या 'या' तारांकित खेळाडूची मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक

सानिया आणि पेव्हिक या सहाव्या मानांकित जोडीने चौथ्या मानांकित गॅब्रिएला डुब्रोव्स्की-जॉन पियर्स यांचा एक तास ४१ मिनिटांच्या लढतीत शानदार विजय मिळविला.

वृत्तसंस्था

चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताची तारांकित खेळाडू सानिया मिर्झाने तिचा क्रोएशियन साथीदार मेट पेव्हिक याच्यासह मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात या जोडीने गॅब्रिएला डुब्रोव्स्की आणि जॉन पीअर्स या जोडीचा ६-४, ३-६, ७-५ असा पराभव केला.

सानिया आणि पेव्हिक या सहाव्या मानांकित जोडीने चौथ्या मानांकित गॅब्रिएला डुब्रोव्स्की-जॉन पियर्स यांचा एक तास ४१ मिनिटांच्या लढतीत शानदार विजय मिळविला. सानियाची ही शेवटची विम्बल्डन स्पर्धा असणार आहे. या मोसमानंतर टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे तिने आधीच जाहीर केले आहे. आता उर्वरित दोन सामने जिंकून सानियाला तिचे शेवटचे विम्बल्डन संस्मरणीय करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. तिने प्रथमच विम्बल्डन ओपनच्या मिश्र दुहेरी प्रकारात उपांत्य फेरी गाठली.

उपांत्य फेरीत सानिया आणि पेव्हिकची जोडीचा सामना दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याशी होईल. उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना डेजारे-नील स्कुप्स्की या द्वितीय मानांकित जोडी आणि सातव्या मानांकित जेलेना ओस्टापेन्को-रॉबर्ट फराह यांच्यात आहे.

सानियाने महिला दुहेरी गटातही भाग घेतला होता. परंतु ती आणि तिची चेक जोडीदार लुसी पहिल्याच सामन्यात बाहेर गेल्या होत्या.

Dharmendra Death: बॉलिवूडचा 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे निधन, सनी देओलकडून मुखाग्नी; मनोरंजन विश्वात शोककळा

CJI Surya Kant Oath : न्या. सूर्य कांत बनले भारताचे ५३ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली शपथ; ७ देशांचे मुख्य न्यायाधीश हजर

पंकजा मुंडे यांचे स्टेटमेंट वाचून धक्का बसला : अंजली दमानिया; गौरी गर्जे प्रकरणात उपस्थित केले गंभीर सवाल

Ram Mandir Flag Hoisting: ध्वजारोहणासाठी अयोध्या नगरी सजली, कडक सुरक्षा तैनात; उद्या होणाऱ्या कार्यक्रमात मोबाईल बंदी

रायगडच्या दहा नगरपालिकांमध्ये ‘लेकी-सुनां’ची एन्ट्री, राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी जोरदार तयारी