क्रीडा

विराट करिश्मा! आयपीएलमध्ये फटकावल्या ७५०० धावा; आठव्या शतकाला गवसणी

सातव्या षटकांत चौथ्या चेंडूवर एकेरी धाव घेत त्याने साडेसात हजार धावांचे शिखर गाठले. त्याच्या नावावर २४२ सामन्यांत ५२ अर्धशतकेही जमा आहेत. कोहलीखालोखाल शिखर धवनचा (६७५५) क्रमांक लागतो.

Swapnil S

जयपूर : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात कोहलीचा विराट करिश्मा पाहायला मिळाला. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ बाद १८३ धावा उभारल्या. त्याचबरोबर आयपीएलमध्ये ७५०० धावांचा टप्पा गाठणारा विराट हा पहिला फलंदाज ठरला. त्याचे हे आयपीएलमधील आठवे शतक ठरले.

सातव्या षटकांत चौथ्या चेंडूवर एकेरी धाव घेत त्याने साडेसात हजार धावांचे शिखर गाठले. त्याच्या नावावर २४२ सामन्यांत ५२ अर्धशतकेही जमा आहेत. कोहलीखालोखाल शिखर धवनचा (६७५५) क्रमांक लागतो. विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. कोहलीने ३९ चेंडूंत अर्धशतक साजरे केल्यानंतर पुढील २८ चेंडूंत त्याने शतकाला गवसणी घातली. त्याने ७२ चेंडूंत १२ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ११३ धावा फटकावल्या.

कोहली-ड्यू प्लेसिस यांनी सलामीसाठी १२५ धावा जोडल्या. ड्यू प्लेसिसने ४४ धावांचे योगदान दिले. ग्लेन मॅक्सवेल (१) आणि सौरव चौहान (९) हे फलंदाज अपयशी ठरले. राजस्थानकडून यजुर्वेंद्र चहलने दोन विकेट्स मिळवले.

आयपीएल गुणतालिका

संघ - सामने - जय - पराजय - गुण - धावगती

  • कोलकाता - ३ - ३ - ० - ६ - २.५१८

  • राजस्थान - ३ - ३ - ० - ६ - १.२४९

  • चेन्नई - ४ - २ - २ - ४ - ०.५१७

  • लखनऊ - ३ - २ - १ - ४ - ०.४८३

  • हैदराबाद - ४ - २ - २ - ४ - ०.४०९

  • पंजाब - ४ - २ - २ - ४ - -०.२२०

  • गुजरात - ४ - २ - २ - ४ - -०.५८०

  • बंगळुरू - ४ - १ - ३ - २ - -०.८७६

  • दिल्ली - ४ - १ - ३ - २ - -१.३४७

  • मुंबई - ३ - ० - ३ - ० - -१.४२३

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश