IPL 2024
IPL 2024  
क्रीडा

IPL 2024 Schedule : बीसीसीआयचं लाईव्ह स्ट्रिमिंग केव्हा आणि कुठे पाहाल? वाचा सविस्तर

Naresh Shende

आगामी होणाऱ्या आयपीएल २०२४ चं वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) आज गुरुवारी २२ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. आयपीएल २०२४ चा हंगाम २२ मार्चपासून सुरु होऊ शकतो, अशी माहिती चेअरमन अरुण धुमाळ यांना दिली होती. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचं वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत निश्चित माहिती समोर येत नाहीय. रिपोर्टनुसार, आयपीएल येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात होणार असल्याचं समजतं.

यंदाचा आयपीएल हंगाम पाहण्यासाठी अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या यावर्षी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. तर एम एस धोनी यावर्षी शेवटची आयपीएल खेळेल, अशी चर्चा आहे. तसंच भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करून नव्याने उभारी देणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे दुखापतीनंतर ऋषभ पंतचं आयपीएलमध्ये पुनरागमन होणार आहे. आयपीएलच्या १५ सामन्यांसाठी बीसीसीआय वेळापत्रक जाहीर करणार आहे, तर उर्वरीत सामन्यांच्या वेळापत्रकाची माहिती काही दिवसांनी दिली जाणार आहे. आज सायंकाळी ५ वाजता आयपीएल २०२४ च्या वेळापत्रकाबाबत माहिती देण्यात येणार आहे. तर साडेचार वाजता आयपीएलचा प्रि शो सुर होणार आहे.

'इथे' पाहू शकता लाईव्ह स्ट्रिमिंग

आयपीएल २०२४ च्या वेळापत्रकाबाबतचं लाईव्ह प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ वर दाखवलं जाईल. ज्यांना ओटीटीवर हे पाहायचं असेल, ते जिओ सिनेमा अॅप किंवा जिओ सिनेमा डॉट कॉमवर पाहू शकतील.

स्वतःला जंगली प्राणी समजता काय? नॅशनल पार्कमधील झोपडीधारकांना हायकोर्टाने सुनावले; तातडीने जंगल खाली करण्याचे तोंडी आदेश

सीईटी निकालानंतर प्रवेशाची प्रतीक्षा; प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू नसल्याने विद्यार्थी, पालक चिंतेत

लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ! NDA कडून ओम बिर्ला, विरोधकांकडून के. सुरेश; उपाध्यक्षपदाची विरोधकांची मागणी फेटाळली

पुणे ड्रग्ज पार्टीप्रकरणी हॉटेल रेनबोचा परवाना रद्द

अखेर रेसकोर्सची १२० एकर जमीन पालिकेच्या ताब्यात; राज्य सरकारची मंजुरी