IPLची रणधुमाळी सुरू! बंगळुरू-हैदराबाद लढतीने आजपासून १९व्या पर्वाला शानदार प्रारंभ (Photo-X/@IPL)
क्रीडा

IPLची रणधुमाळी सुरू! बंगळुरू-हैदराबाद लढतीने आजपासून १९व्या पर्वाला शानदार प्रारंभ

देशभरातील क्रिकेटप्रेमी ज्या सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात तोच ‘इंडिया का त्योहार’ म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम शनिवारपासून सुरू होणार आहे.

Swapnil S

बंगळुरू : देशभरातील क्रिकेटप्रेमी ज्या सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात तोच ‘इंडिया का त्योहार’ म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम शनिवारपासून सुरू होणार आहे. बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या सलामीच्या लढतीत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सनरायजर्स हैदराबादशी गाठ पडणार आहे. आयपीएलच्या निमित्ताने पुढील २ महिने चाहत्यांचे मनोरंजन होणार आहे, हे निश्चित.

काही आठवड्यांपूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला.

आता आयपीएलच्या १९व्या हंगामाचे वेध सर्वांना लागले आहेत. २८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. काही दिवसांपूर्वी १२ एप्रिलपर्यंतच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असे त्यावेळी बीसीसीआयने स्पष्ट केले होते. आता तिन्ही राज्यांतील निवडणुकांची तारखी समोर आलेली आहे. त्यामुळे स्पर्धा चालू होण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना बीसीसीआयने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.

दरम्यान, यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. आयपीएलमध्ये मुंबई-चेन्नई लढतीची नेहमीच उत्कंठा लागून असते. यंदा चाहत्यांना दोन वेळा या संघांमधील द्वंद्व पाहायला मिळेल. २३ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई-चेन्नई आमनेसामने येतील. महेंद्रसिंह धोनीचा हा वानखेडेवर अखेरचा आयपीएल सामना ठरू शकतो. त्यानंतर २ मे रोजी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर मुंबई पुन्हा चेन्नईशी दोन हात करेल.

गतवर्षी मुंबईचा संघ गुजरात व दिल्लीविरुद्ध वानखेडेवर सामना खेळला होता. यंदा त्या दोघांविरुद्ध मुंबईचा वानखेडेवर सामना नसेल. त्यांच्या ऐवजी राजस्थान व पंजाब यंदा मुंबईविरुद्ध वानखेडेवर खेळतील. पंजाबविरुद्ध २०२३मध्ये, तर राजस्थानविरुद्ध २०२४मध्ये मुंबईचा वानखेडेवर अखेरचा सामना झाला होता. यंदा एकंदर मुंबईचा संघ अनुक्रमे कोलकाता, बंगळुरू, पंजाब, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ व राजस्थान या संघांविरुद्ध सात सामने वानखेडेवर खेळणार आहे. २९ मार्च रोजी कोलकाताविरुद्धच्या लढतीने मुंबईचा संघ आपल्या अभियानास प्रारंभ करणार आहे.

वेळापत्रकातील महत्त्वाची बाब म्हणजे यंदा विराट कोहलीचा समावेश असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व चेन्नई यांच्यात एकदाच लढत होईल. ५ एप्रिल रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होईल. आता वेळापत्रक जाहीर झाल्याने सर्व चाहत्यांनी आवडत्या सामन्यांनुसार तिकिटांसाठी धडपड चालू केली आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सर्वांचे मनोरंजन होणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप कसे?

  • दरवर्षीप्रमाणे यंदाही १० संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून प्रत्येक संघ १४ सामने खेळणार आहे. गुणतालिका मात्र सर्व संघांची मिळून एकच असेल. पहिल्या गटात चेन्नई, कोलकाता, राजस्थान, बंगळुरू आणि पंजाब यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात मुंबई, हैदराबाद, गुजरात, दिल्ली आणि लखनऊ हे संघ आहेत.

  • प्रत्येक संघाला आपल्या गटातील संघांसोबत प्रत्येकी एकदा खेळायचे आहे. तर दुसऱ्या गटातील संघांविरुद्ध प्रत्येक दोन लढती खेळायच्या आहेत. म्हणजेच मुंबईचा संघ चेन्नई, कोलकाता, राजस्थान, बंगळुरू व पंजाब यांच्याविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळणार आहे. तर अन्य संघांशी त्यांची एकच साखळी लढत होईल.

  • साखळी फेरीअखेरीस आघाडीचे चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. २४ मेपर्यंत साखळी फेरी संपेल. मग २६ मे रोजी क्वालिफायर-१, २७ मे रोजी एलिमिनेटर, २९ मे रोजी क्वालिफायर-२, तर ३१ तारखेला महाअंतिम सामना रंगेल. बाद फेरीच्या सामन्यांची ठिकाणे कालांतराने जाहीर करण्यात येतील. इम्पॅक्ट प्लेयर नियम यंदादेखील कायम राखण्यात आला आहे.

वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने

  • मुंबई वि. कोलकाता (रविवार, २९ मार्च : सायंकाळी ७.३० वाजता)

  • मुंबई वि. बंगळुरू (रविवार, १२ एप्रिल : सायंकाळी ७.३० वाजता)

  • मुंबई वि. पंजाब (गुरुवार, १६ एप्रिल : सायंकाळी ७.३० वाजता)

  • मुंबई वि. चेन्नई (गुरुवार, २३ एप्रिल : सायंकाळी ७.३० वाजता)

  • मुंबई वि. हैदराबाद (बुधवार, २९ एप्रिल : सायंकाळी ७.३० वाजता)

  • मुंबई वि. लखनऊ (सोमवार, ४ मे : सायंकाळी ७.३० वाजता)

  • मुंबई वि. राजस्थान (रविवार, २४ मे : दुपारी ३.३० वाजता)

विराटवर आज लक्ष, धूमधडाका अपेक्षित

आयपीएलच्या शनिवारी रंगणाऱ्या सलामीच्या लढतीत बंगळुरूसमोर हैदराबादचे कडवे आव्हान असेल. या लढतीत चिन्नास्वामी स्टेडियमवर चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे.

रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने गतवर्षी प्रथमच आयपीएलचे जेतेपद मिळवले. त्यामुळे विराट कोहलीसह बंगळुरूच्या तमाम चाहत्यांची १८ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. यंदा पुन्हा नव्या जोमाने हा संघ जेतेपद कायम राखण्यास सज्ज आहे. मात्र त्यांच्यापुढे कठीण आव्हान असेल. बंगळुरूची फलंदाजी फिल सॉल्ट, विराट, जेकब बेथल, देवदत्त पडिक्कल यांच्यावर अवलंबून आहे. विराट २ महिन्यांनी पुन्हा चाहत्यांना खेळताना दिसेल. त्याशिवाय जितेश शर्मा, रजत पाटीदार व कृणाल पंड्या असे फलंदाजही त्यांच्याकडे आहेत. गोलंदाजीत जोश हेझलवूड बंगळुरूचा हुकमी एक्का आहे. मात्र तो दुखापतीमुळे काही लढतींना मुकणार आहे. अशा स्थितीत भुवनेश्वर कुमार व रोमारिओ शेफर्ड यांच्यावर बंगळुरूची मदार असेल. फिरकीपटू सुयश शर्मा छाप पाडू शकतो.

दुसरीकडे पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत यंदा इशान किशन काही लढतींसाठी हैदराबादचे नेतृत्व करणार आहे. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन असे धडाकेबाज फलंदाज बंगळुरूकडे आहेत. तसेच चिन्नास्वामीचे मैदान आकाराने लहान असून येथे दवही मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे चौकार-षटकारांची उधळण पाहायला मिळू शकते.

आयपीएल २०२६चे वेळापत्रक (साखळी फेरी)

  • २८ मार्च शनिवार बंगळुरू वि. हैदराबाद बंगळुरू सायंकाळी ७.३० वा.

  • २९ मार्च रविवार मुंबई वि. कोलकाता मुंबई सायंकाळी ७.३० वा.

  • ३० मार्च सोमवार राजस्थान वि. चेन्नई गुवाहाटी सायंकाळी ७.३० वा.

  • ३१ मार्च मंगळवार पंजाब वि. गुजरात मुल्लानपूर सायंकाळी ७.३० वा.

  • १ एप्रिल बुधवार लखनऊ वि. दिल्ली लखनऊ सायंकाळी ७.३० वा.

  • २ एप्रिल गुरुवार कोलकाता वि. हैदराबाद कोलकाता सायंकाळी ७.३० वा.

  • ३ एप्रिल शुक्रवार चेन्नई वि. पंजाब चेन्नई सायंकाळी ७.३० वा.

  • ४ एप्रिल शनिवार दिल्ली वि. मुंबई दिल्ली दुपारी ३.३० वा.

  • ४ एप्रिल शनिवार गुजरात वि. राजस्थान अहमदाबाद सायंकाळी ७.३० वा.

  • ५ एप्रिल रविवार हैदराबाद वि. लखनऊ हैदराबाद दुपारी ३.३० वा.

  • ५ एप्रिल रविवार बंगळुरू वि. चेन्नई बंगळुरू सायंकाळी ७.३० वा.

  • ६ एप्रिल सोमवार कोलकाता वि. पंजाब कोलकाता सायंकाळी ७.३० वा.

  • ७ एप्रिल मंगळवार राजस्थान वि. मुंबई गुवाहाटी सायंकाळी ७.३० वा.

  • ८ एप्रिल बुधवार दिल्ली वि. गुजरात दिल्ली सायंकाळी ७.३० वा.

  • ९ एप्रिल गुरुवार कोलकाता वि. लखनऊ कोलकाता सायंकाळी ७.३० वा.

  • १० एप्रिल शुक्रवार राजस्थान वि. बंगळुरू गुवाहाटी सायंकाळी ७.३० वा.

  • ११ एप्रिल शनिवार पंजाब वि. हैदराबाद मुल्लानपूर दुपारी ३.३० वा.

  • ११ एप्रिल शनिवार चेन्नई वि. दिल्ली चेन्नई सायंकाळी ७.३० वा.

  • १२ एप्रिल रविवार लखनऊ वि. गुजरात लखनऊ दुपारी ३.३० वा.

  • १२ एप्रिल रविवार मुंबई वि. बंगळुरू मुंबई सायंकाळी ७.३० वा.

  • १३ एप्रिल सोमवार हैदराबाद वि. राजस्थान हैदराबाद सायंकाळी ७.३० वा.

  • १४ एप्रिल मंगळवार चेन्नई वि. कोलकाता चेन्नई सायंकाळी ७.३० वा.

  • १५ एप्रिल बुधवार बंगळुरू वि. लखनऊ बंगळुरू सायंकाळी ७.३० वा.

  • १६ एप्रिल गुरुवार मुंबई वि. पंजाब मुंबई सायंकाळी ७.३० वा.

  • १७ एप्रिल शुक्रवार गुजरात वि. कोलकाता अहमदाबाद सायंकाळी ७.३० वा.

  • १८ एप्रिल शनिवार बंगळुरू वि. दिल्ली बंगळुरू दुपारी ३.३० वा.

  • १८ एप्रिल शनिवार हैदराबाद वि. चेन्नई हैदराबाद सायंकाळी ७.३० वा.

  • १९ एप्रिल रविवार कोलकाता वि. राजस्थान कोलकाता दुपारी ३.३० वा.

  • १९ एप्रिल रविवार पंजाब वि. लखनऊ मुल्लानपूर सायंकाळी ७.३० वा.

  • २० एप्रिल सोमवार गुजरात वि. मुंबई अहमदाबाद सायंकाळी ७.३० वा.

  • २१ एप्रिल मंगळवार हैदराबाद वि. दिल्ली हैदराबाद सायंकाळी ७.३० वा.

  • २२ एप्रिल बुधवार लखनऊ वि. राजस्थान लखनऊ सायंकाळी ७.३० वा.

  • २३ एप्रिल गुरुवार मुंबई वि. चेन्नई मुंबई सायंकाळी ७.३० वा.

  • २४ एप्रिल शुक्रवार बंगळुरू वि. गुजरात बंगळुरू सायंकाळी ७.३० वा.

  • २५ एप्रिल शनिवार दिल्ली वि. पंजाब दिल्ली दुपारी ३.३० वा.

  • २५ एप्रिल शनिवार राजस्थान वि. हैदराबाद जयपूर सायंकाळी ७.३० वा.

  • २६ एप्रिल रविवार गुजरात वि. चेन्नई अहमदाबाद दुपारी ३.३० वा.

  • २६ एप्रिल रविवार लखनऊ वि. कोलकाता लखनऊ सायंकाळी ७.३० वा.

  • २७ एप्रिल सोमवार दिल्ली वि. बंगळुरू दिल्ली सायंकाळी ७.३० वा.

  • २८ एप्रिल मंगळवार पंजाब वि. राजस्थान मुल्लानपूर सायंकाळी ७.३० वा.

  • २९ एप्रिल बुधवार मुंबई वि. हैदराबाद मुंबई सायंकाळी ७.३० वा.

  • ३० एप्रिल गुरुवार गुजरात वि. बंगळुरू अहमदाबाद सायंकाळी ७.३० वा.

  • १ मे शुक्रवार राजस्थान वि. दिल्ली जयपूर सायंकाळी ७.३० वा.

  • २ मे शनिवार चेन्नई वि. मुंबई चेन्नई सायंकाळी ७.३० वा.

  • ३ मे रविवार हैदराबाद वि. कोलकाता हैदराबाद दुपारी ३.३० वा.

  • ३ मे रविवार गुजरात वि. पंजाब अहमदाबाद सायंकाळी ७.३० वा.

  • ४ मे सोमवार मुंबई वि. लखनऊ मुंबई सायंकाळी ७.३० वा.

  • ५ मे मंगळवार दिल्ली वि. चेन्नई दिल्ली सायंकाळी ७.३० वा.

  • ६ मे बुधवार हैदराबाद वि. पंजाब हैदराबाद सायंकाळी ७.३० वा.

  • ७ मे गुरुवार लखनऊ वि. बंगळुरू लखनऊ सायंकाळी ७.३० वा.

  • ८ मे शुक्रवार दिल्ली वि. कोलकाता दिल्ली सायंकाळी ७.३० वा.

  • ९ मे शनिवार राजस्थान वि. गुजरात जयपूर सायंकाळी ७.३० वा.

  • १० मे रविवार चेन्नई वि. लखनऊ चेन्नई दुपारी ३.३० वा.

  • १० मे रविवार बंगळुरू वि. मुंबई रायपूर सायंकाळी ७.३० वा.

  • ११ मे सोमवार पंजाब वि. दिल्ली धरमशाला सायंकाळी ७.३० वा.

  • १२ मे मंगळवार गुजरात वि. हैदराबाद अहमदाबाद सायंकाळी ७.३० वा.

  • १३ मे बुधवार बंगळुरू वि. कोलकाता बंगळुरू सायंकाळी ७.३० वा.

  • १४ मे गुरुवार पंजाब वि. मुंबई धरमशाला सायंकाळी ७.३० वा.

  • १५ मे शुक्रवार लखनऊ वि. चेन्नई लखनऊ सायंकाळी ७.३० वा.

  • १६ मे शनिवार कोलकाता वि. गुजरात कोलकाता सायंकाळी ७.३० वा.

  • १७ मे रविवार पंजाब वि. बंगळुरू धरमशाला दुपारी ३.३० वा.

  • १७ मे रविवार दिल्ली वि. राजस्थान दिल्ली सायंकाळी ७.३० वा.

  • १८ मे सोमवार चेन्नई वि. हैदराबाद चेन्नई सायंकाळी ७.३० वा.

  • १९ मे मंगळवार राजस्थान वि. लखनऊ जयपूर सायंकाळी ७.३० वा.

  • २० मे बुधवार कोलकाता वि. मुंबई कोलकाता सायंकाळी ७.३० वा.

  • २१ मे गुरुवार चेन्नई वि. गुजरात चेन्नई सायंकाळी ७.३० वा.

  • २२ मे शुक्रवार हैदराबाद वि. बंगळुरू हैदराबाद सायंकाळी ७.३० वा.

  • २३ मे शनिवार लखनऊ वि. पंजाब लखनऊ सायंकाळी ७.३० वा.

  • २४ मे रविवार मुंबई वि. राजस्थान मुंबई दुपारी ३.३० वा.

  • २४ मे रविवार कोलकाता वि. दिल्ली कोलकाता सायंकाळी ७.३० वा.

कर कमी, पण दर नाही कमी; पेट्रोलवरच्या अबकारी करात घट, युद्धपरिणामांपासून ग्राहकांचे रक्षण

Iran vs US-Israel War : इराण ऊर्जा प्रकल्पांवर १० दिवस हल्ला नाही; ट्रम्प यांची ४८ तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा नवी घोषणा

१ एप्रिलपासून वीजदर घटणार; २०३० पर्यंत ग्राहकांना टप्प्याटप्प्याने दिलासा

नरहरी झिरवाळ यांच्यावर कारवाईची टांगती तलवार; व्हिडीओ खरा असल्यास योग्य कारवाई, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण

राज्यभरातील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय; २०११ पर्यंतच्या अतिक्रमणांना फायदा