IPL 2026 : आयपीएलच्या पटलावर मुकूल चाैधरीचा उदय 
क्रीडा

IPL 2026 : आयपीएलच्या पटलावर मुकूल चाैधरीचा उदय

आयपीएलच्या पटलावर गुरुवारी रात्री २१ वर्षीय मुकूल चौधरीच्या रूपात नव्या ताऱ्याचा उदय झाला.

Swapnil S

कोलकाता : आयपीएलच्या पटलावर गुरुवारी रात्री २१ वर्षीय मुकूल चौधरीच्या रूपात नव्या ताऱ्याचा उदय झाला. लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना मुकूलने दडपणात २७ चेंडूंत नाबाद ५४ धावांची घणाघाती खेळी साकारली. त्यामुळे लखनऊने ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सला ३ गडी राखून पराभूत केले. कोलकाताने दिलेले १८२ धावांचे लक्ष्य लखनऊने अखेरच्या चेंडूवर गाठले.

राजस्थानच्या झुनझुनू गावात जन्मलेल्या मुकूलला लखनऊने लिलावात २.६ कोटी रुपयांत खरेदी केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी हैदराबादविरुद्ध खेळताना अखेरच्या षटकात तो काहीसा चाचपडताना दिसला होता. मात्र गुरुवारी कोलकाताविरुद्ध त्याने आपले कौशल्य दाखवून दिले. मुकूल जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा लखनऊला ४३ चेंडूंत ७८ धावांची गरज होती. तसेच लखनऊचे पाच फलंदाज बाद झाले होते. मात्र मुकूलने एक हाती खिंड लढवली. मोहम्मद शमी, आवेश खान यांच्यासह त्याने लढा दिला.

त्याने लगावलेला हॅलिकॉप्टर शॉट पाहण्याजोगा होता. तसेच २ चेंडूंत ७ धावांची गरज असताना कव्हर्सच्या वरून फटका लगावून मुकूलने लखनऊचा विजय पक्का केला. अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना मुकूल फटका लगावू शकला नाही. मात्र कोलकाताचा यष्टिरक्षक रघुवंशीने थ्रो करेपर्यंत आवेश व मुकूल यांनी एक धाव पूर्ण केली. रघुवंशीचा थ्रोदेखील स्टम्प्सवर लागला नाही. त्यामुळे लखनऊने सलग दुसरा विजय नोंदवला, तर कोलकाताला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत. २८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद