क्रीडा

आयर्लंडचा स्कॉटलंडवर सहा विकेट्स राखून विजय; कर्टिस कॅम्फर सामनावीर

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात निराशाजनक झाली.

वृत्तसंस्था

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यात आयर्लंडने स्कॉटलंडवर सहा विकेट्स आणि सहा चेंडू राखून विजय मिळविला.

विजयासाठीचे १७७ धावांचे लक्ष्य आयर्लंडने १९ षटकांत ४ बाद १८० धावा करीत साध्य केले. दोन षटकार आणि सात चौकारांसह ३२ चेंडूंत नाबाद ७२ धावा आणि ९ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट‌्स घेणाऱ्या कर्टिस कॅम्फरला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार अॅन्डी बालबिर्नी (१४) चौथ्या षटकात लवकर बाद झाला. पॉल स्टर्लिंगची (८) पाचव्या षटकात परतला. १०व्या षटकात हॅरी टेक्टर बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या ४ विकेटवर ६१ धावा होती. त्यानंतर कर्टिस कॅम्पर (३२ चेंडूत नाबाद ७२) आणि जॉर्ज डॉकरेल (२७ चेंडूंत ३९) विजय साकार केला. दोघांमध्ये १२९ धावांची नाबाद भागीदारी झाली.

स्कॉटलंडचा हा पहिला पराभव ठरला. स्कॉटलंडने पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित षटकांत ५ विकेट गमावत १७६ धावांची मोठी धावसंख्या उभारली; पण आयर्लंडने शानदार फलंदाजी करत ६ चेंडू राखत सामना ६ विकेट्सने जिंकला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडची सुरुवात निराशाजनक झाली. जॉर्ज मुन्से १ धावा काढून बाद झाला. मायकेल जोन्स खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने क्रॉससोबत दुसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. कॉस २८ धावांवर बाद झाला. जोन्सने आपले अर्धशतक पूर्ण केले. जोन्स शतकाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच ८६ धावांवर जोशुआ लिटलने त्याची विकेट घेतली. जोन्सने ५५ चेंडूंना सामोरे जात ६ चौकार आणि ४ षटकार लगावले.

शेवटच्या दोन षटकांत आयर्लंडच्या गोलंदाजांनी अवघ्या १५ धावा दिल्या. मदतीने ८६ धावा केल्या. कर्णधार रिची ब्रिंग्टनने ३७ धावा केल्या. आयर्लंडकडून अष्टपैलू कर्टिस कॅम्परने २ षटकांत ९ धावा देत दोन बळी टिपले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी