तिलक वर्माकडे भारताच्या तिन्ही संघात खेळण्याची क्षमता - इरफान पठाण 
क्रीडा

तिलक वर्माकडे भारताच्या तिन्ही संघात खेळण्याची क्षमता - इरफान पठाण

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने प्रतिभावान तिलक वर्माच्या कौशल्याचे कौतुक करतानाच त्याच्याकडे तिन्ही प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी असल्याचे सांगितले.

Swapnil S

ख्राईस्टचर्च : भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने प्रतिभावान तिलक वर्माच्या कौशल्याचे कौतुक करतानाच त्याच्याकडे तिन्ही प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी असल्याचे सांगितले.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला फलंदाज तिलकने सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी सामन्यापूर्वी दिलेल्या पाठिंब्याची आठवण काढली. संपूर्ण देशाला आपल्यावर विश्वास आहे आणि शेवटपर्यंत टिकून राहिल्यास आपण विजय मिळवू शकतो, असे या दोन्ही प्रशिक्षकांनी आपल्याला सांगितल्याचे तिलक वर्माने स्पष्ट केले.

“मी फक्त शेवटपर्यंत फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. या सामन्यापूर्वी गौतम सर आणि कोटक सर यांच्याशी माझे बोलणे झाले होते. संपूर्ण भारताचा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू शेवटपर्यंत खेळलास, तर आपण जिंकू शकतो, असे त्यांनी मला सांगितले. स्वतःच्या कामगिरीचा मला खूप अभिमान आहे,” असे तिलक म्हणाला.

भारताने पाच लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली असून तिसरा सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.

फर्ग्युसन, हेन्री तिसऱ्या लढतीला मुकणार

भारताविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी न्यूझीलंड संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. कार्यभार व्यवस्थापनाचा (वर्कलोड मॅनेजमेंट) एक भाग म्हणून वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री हे दोघे तिसऱ्या सामन्याला मुकणार आहेत. फर्ग्युसन रविवारी ऑकलंडला रवाना होऊन अनुक्रमे ईडन पार्क आणि सेडन पार्क येथे होणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यांसाठी पुन्हा संघात सामील होणार आहेत, तर हेन्री ख्राईस्टचर्चमध्येच राहणार असून २ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये एकदिवसीय संघात सामील होईल. दुसऱ्या बाजूला, काइल जेमिसन मंगळवारी तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर वेलिंग्टनमध्येच थांबणार असून, ३१ ऑक्टोबर रोजी सेलो बेसिन रिझर्व्ह येथे होणाऱ्या फोर्ड ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत कँटरबरीकडून खेळणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राष्ट्रवादीला अर्थखाते? फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद; हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता

राहुल गांधी यांचा १ नोव्हेंबरला 'चलो दिल्ली'चा नारा

Mumbai: भगवती रुग्णालयाचा कारभार खासगी संस्थेकडे; ४९० खाटांसाठी निविदा प्रक्रिया, ५० टक्के खाटा पालिका रुग्णांसाठी राखीव

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड सरकारपुढे जास्तच नम्र राहिले; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. के. कौल यांचा आरोप

आंतरराष्ट्रीय विमानांचे नवी मुंबईतून उड्डाण; मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ च्या पुनर्विकासामुळे IndiGo, Air India ची सज्जता