क्रीडा

बुमराला आयसीसीचा मंथ ऑफ प्लेअर पुरस्कार; डिसेंबर २०२४ मध्ये मिळवल्या २२ विकेट

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शानदार कामगिरीमुळे भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने डिसेंबर २०२४ या महिन्यासाठी आयसीसीच्या मंथ ऑफ प्लेअर हा पुरस्कार पटकावला.

Swapnil S

दुबई : बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शानदार कामगिरीमुळे भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने डिसेंबर २०२४ या महिन्यासाठी आयसीसीच्या मंथ ऑफ प्लेअर हा पुरस्कार पटकावला.

भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या बुमराने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा घाम काढला. डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या ३ कसोटी सामन्यात त्याने १४.२२ च्या सरासरीने २२ विकेट मिळवल्या. बॉर्डर-गावस्कर मालिकेत त्याने ३२ बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेन पिटरसन यांना मागे टाकत बुमराने हा पुरस्कार पटकावला. तसेच २० पेक्षा कमी सरासरीने २०० कसोटी बळी मिळविण्याची कामगिरी करणारा बुमरा पहिला गोलंदाज ठरला आहे.

बॉर्डर-गावस्कर मालिका भारतो १-३ अशी गमावली. मालिकेत भारताच्या अन्य खेळाडूंना विशेष कामगिरी करता आली नसली तरी बुमराने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धडकी भरवली. शानदार कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; मिरवणुकीला जल्लोषात प्रारंभ

मुंबईत हाय अलर्ट! ३४ मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी; 'लष्कर ए जिहादी'चा पोलिसांना संदेश

मला विचारून 'जीआर' काढल्याचा गैरसमज पसरवू नका! मंत्री भुजबळांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा

अंजना कृष्णा धमकी प्रकरण : अजितदादांची सारवासारव; अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता!