क्रीडा

आशिया क्रिकेट स्पर्धेतून भारताचा वेगवान गोलंदाज 'या' कारणामुळे बाहेर

भारत या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर करणार असतानाच भारतीय संघासाठी वाईट बातमी मिळाली आहे

वृत्तसंस्था

येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारत या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर करणार असतानाच भारतीय संघासाठी वाईट बातमी मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो आशिया चषकामध्ये खेळणार नाही. टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने पुनरागमन करावे, अशी आमची इच्छा आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आशिया चषकामध्ये बुमराहला सहभागी करून धोका पत्करता येणार नाही. त्याचा समावेश झाल्यास आणि तो खळल्यास त्याची दुखापत वाढू शकते.

आशिया चषक स्पर्धेसाठी विराट कोहली, के एल राहुल, जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन होण्याची अपेक्षा होती. बुमराह आता खेळू शकणार नाही. या स्पर्धेसाठी आतापर्यंत केवळ पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे.

यावेळच्या आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले होते; मात्र तेथील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती बघता स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे हलविण्यात आली. दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथे टी-२० फॉर्मेटमध्ये आशिया चषक स्पर्धा होणार आहे.

Bihar Election Results 2025 Live Updates: एनडीए २०० च्या पार; "ही ज्ञानेश कुमार यांची जादू"; काँग्रेसच्या भूपेश बघेल यांची टीका

Assembly Bypolls Result 2025 : अंतापाठोपाठ जुबली हिल्समध्येही काँग्रेसचा दमदार विजय; बघा अन्य ६ जागांवर कोणाची बाजी?

सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

CSMT : लाल बॅगेचं गूढ उलगडलं! कोणताही धोका नाही, बॅगेत आढळल्या 'या' वस्तू