केन विल्यमसन @SelflessCricket
क्रीडा

केन विल्यमसनचा टी-२० क्रिकेटला अलविदा; ९३ टी-२० सामन्यांत केले न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व

दिग्गज फलंदाज आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने रविवारी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. बुधवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी १४ खेळाडूंच्या संघांत त्याला स्थान देण्यात आले नाही. टी-२० क्रिकेटमधील निवृत्तीनंतर हा खेळाडू एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करणार आहे.

Krantee V. Kale

ऑकलंड : दिग्गज फलंदाज आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने रविवारी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वेस्ट इंडीज विरुद्ध ५ सामन्यांच्या मालिकेला काही दिवस शिल्लक असताना विल्यमसनने टी-२० क्रिकेटला अलविदा केला.

विल्यमसनने न्यूझीलंडसाठी ९३ टी-२० सामने खेळले आहेत. या ३५ वर्षीय खेळाडूला बुधवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी १४ खेळाडूंच्या संघांत स्थान देण्यात आले नाही.

विल्यमसनने टी-२० क्रिकेटमध्ये २५७५ धावा चोपल्या आहेत. क्रिकेटच्या या प्रकारात त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. टी-२० क्रिकेटमधील निवृत्तीनंतर हा खेळाडू एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करणार आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक धावा जमवणारा दुसरा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. ३३ च्या सरासरीने धावा जमवल्या असून त्याच्या खात्यात १८ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० क्रिकेटमधील ९५ ही त्याची सर्वाधिक धावांची खेळी आहे.

क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून विल्यमसनने आतापर्यंत १९,००० धावा जमवल्या आहेत. २०११ मध्ये त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. ७५ सामन्यांमध्ये त्याने न्यूझीलंडच्या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडने दोन वेळा टी-२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून एक वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

"टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची ही योग्य वेळ आहे. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघाला पुरेसा वेळ मिळेल. आमच्याकडे भरपूर प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांना तयार करण्यासाठी हा काळ महत्त्वाचा ठरेल." - केन विल्यमसन

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

'कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, पण जोपर्यंत रंगेहाथ पकडत नाही...'; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाली पत्नी सुनीता?