क्रीडा

पुन्हा संधी मिळणे हे खूपच खास; करुण नायरने व्यक्त केली भावना

भारतीय संघात दुसऱ्यांदा संधी मिळणे कठीण असते. मात्र करुण नायर भाग्यवान आहे. त्याला पुन्हा एकदा भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाली आहे. या संधीमुळे खूपच खास वाटत असल्याच्या भावना नायरने व्यक्त केल्या.

Swapnil S

बेकनहॅम : भारतीय संघात दुसऱ्यांदा संधी मिळणे कठीण असते. मात्र करुण नायर भाग्यवान आहे. त्याला पुन्हा एकदा भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाली आहे. या संधीमुळे खूपच खास वाटत असल्याच्या भावना नायरने व्यक्त केल्या.

भारतीय संघात पुन्हा संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आठ वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन केलेल्या नायरने नमूद केले.

नायरच्या पुनरागमनाबाबत बोलताना मुख्य प्रशिक्षक गंभीर यांनीही त्याचे कौतुक केले. कमबॅक करणे कधीच सोपे नसते. त्याने जमवलेल्या धावा आणि कधीही हार न मानण्याचा दृष्टिकोन हे प्रेरणादायी असल्याचे गंभीर म्हणाले होते.

माझ्या मनात काय भावना असतील हे मी आत्ताच सांगू शकत नाही. पण निश्चितच जेव्हा मी भारतीय जर्सीत मैदानात उतरेन तो माझ्यासाठी स्वप्नवत क्षण असेल, असे नायर म्हणाला.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ ॲप अनिवार्य; सायबर फसवणुकीवर लगाम

"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी

मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या ३० मिनिटांत! MMRDA कडून एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनच्या कामाला सुरुवात

'उतावीळ लोकं, उतावीळ कामं'! समांथाने राज निदिमोरूशी 'गुपचूप' केलं लग्न; दिग्दर्शकाच्या पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत