क्रीडा

करुण नायर की नितीश रेड्डी? वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीसाठी लवकरच भारतीय संघाची निवड

वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १५ जणांच्या भारतीय संघाची निवड लवकरच जाहीर होऊ शकते. त्यासाठी बुधवार किंवा गुरुवारी व्हर्च्युअली बैठक होण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत संघात स्थान मिळवण्यासाठी करुण नायर आणि नितीश रेड्डी यांच्यात स्पर्धा असल्याचे जाणकार सांगतात.

Swapnil S

दुबई : वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १५ जणांच्या भारतीय संघाची निवड लवकरच जाहीर होऊ शकते. त्यासाठी बुधवार किंवा गुरुवारी व्हर्च्युअली बैठक होण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत संघात स्थान मिळवण्यासाठी करुण नायर आणि नितीश रेड्डी यांच्यात स्पर्धा असल्याचे जाणकार सांगतात.

विंडीजविरुद्ध पहिली कसोटी २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादमध्ये खेळवली जाणार आहे, तर दुसरी कसोटी १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीत होईल.

भारतीय संघाच्या ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी करुण नायर आणि नितीश रेड्डी यांच्यात स्पर्धा होऊ शकते. करुणने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत ओव्हलवर अर्धशतक झळकावले होते. तसेच चार सामन्यांत जवळपास प्रत्येक डावात चांगली सुरुवात केली होती. मात्र त्याला मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही.

त्याच्या धावसंख्येत सातत्याचा अभाव होता. त्यानंतर झालेल्या बोटाच्या दुखापतीमुळे त्याला दुलीप करंडक स्पर्धेत खेळता आले नाही. मात्र त्यानंतर त्याला तंदुरुस्त घोषित करण्यात आले.

इंग्लंडविरुद्ध चांगली मेहनत घेतल्यानंतर करुणला वेस्ट इंडिजविरुद्ध संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र त्याला चार कसोटी सामने खेळायला मिळाल्याने आता अन्य खेळाडूंना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता काही जाणकार वर्तवतात.

रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या तिन्ही फिरकीपटूंना संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज संघामध्ये असेल, मात्र बुमराला पहिल्या कसोटीत विश्रांती मिळण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत.

दुबईत होणार चर्चा

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सध्या दुबईत आहेत. तिथे ते कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी आगामी टी-२० विश्वचषक, ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय दौरा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका यावर चर्चा करणार आहेत.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी