एक्स @Kkwcindia
क्रीडा

विश्वचषक ही फक्त सुरुवात, आता लक्ष्य ऑलिम्पिकचे! भारतीय खो-खोपटूंनी व्यक्त केला निर्धार

महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झालेला खो-खो हा खेळ आता जगभरात पोहोचत आहे.

ऋषिकेश बामणे

ऋषिकेश बामणे/नवी दिल्ली

महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झालेला खो-खो हा खेळ आता जगभरात पोहोचत आहे. त्यामुळे आता हळूहळू आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्येही खो-खोला स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही खेळाडू म्हणून आमचे सर्वतोपरी योगदान देऊ, अशा आशयाची मते भारतीय खो-खोपटूंनी व्यक्त केली.

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकाला चाहत्यांचा दमदार प्रतिसाद लाभत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खो-खोपटूंना स्वतःची ओळख निर्माण करण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळेने यासाठी खो-खो महासंघाचे आभार मानले.

विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, असा विचारही कधी केला नव्हता. महासंघाने माझ्यावर विश्वास दर्शवल्याने मी त्यांचे आभारी आहे. तसेच खो-खोपटूंना आता त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत आहे. सर्वांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे," असे प्रियंका म्हणाली.

पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकरनेही अल्टिमेट लीग तसेच राष्ट्रीय स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले. रामजी कश्यप, रेश्मा राठोड या खेळाडूंनीही स्पर्धेपूर्वी झालेल्या शिबिराचा संघाला कशा प्रकारे लाभ झाला, हे सांगितले.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई