PM
PM
क्रीडा

कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील मुंबई, ठाण्याच्या संघांचे आव्हान संपुष्टात

Swapnil S

नंदूरबार : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि नंदूरबार खो-खो असोसिएशनतर्फे आयोजित राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुमार गटात सोलापूर विरुद्ध पुणे, तर कुमारींच्या गटात धाराशीव विरुद्ध नाशिक यांच्यात अंतिम फेरी रंगणार आहे. मुंबई, ठाण्याच्या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

नंदूरबार येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कुमारींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात धाराशीवने सांगलीचा १२-७ असा एक डाव व ५ गुणांनी सहज पराभव केला. अश्विनी शिंदे (४.३० मिनिटे संरक्षण व आक्रमणात १ गडी), संध्या सुरवसे (२.३० मि., २ गडी), प्रणाली काळे (२.३० मि., १ गडी) यांना या विजयाचे श्रेय जाते. सांगलीकडून सानिका चाफेने चांगला खेळ केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात नाशिकने ठाण्यावर १०-९ अशी १.१० मिनिटे व १ गुणांच्या फरकाने मात केली. नाशिककडून सरिता दिवा (३ मि., ३ गडी), ज्योती मेढे (२.१० मि., १ गडी) चमकल्या. ठाण्याकडून दिव्या गायकवाड, स्नावी तळवडेकर यांनी कडवी झुंज दिली.

कुमार गटाच्या पहिल्या उपांत्य लढतीत सोलापूरने सांगलीवर १४-१३ अशी १ गुण व एका मिनिटाच्या फरकाने सरशी साधली. गणेश बोरकर (२.२० मि., ३ गडी), शंभूराज चंदनशिव (१.४० मि., १ गडी), प्रतिक शिंदे (१.३० मि., ३ गडी) या त्रिकुटाने कमाल केली. सांगलीचा आयुश लाड उत्तम खेळला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुण्याने धाराशीवला १४-१३ असे संघर्षानंतर नमवले. तेजस जाधव (२.२० मि., २ गडी), चेतन बिका (१.४० मि., ३ गडी), भावेश मेश्रे (१.३० मि., १ गडी) यांनी अष्टपैलू छाप पाडली. धाराशीवकडून रमेश वसावे, श्रीशंभू पेठे यांनी कडवा संघर्ष केला.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल