FIFA World Cup 2026 : मेस्सीचा गोलधडाका कायम! विश्वचषकात लगावला २० वा गोल; गोल्डन बूटच्या शर्यतीत अग्रेसर, अर्जेंटिनाचा कापे व्हर्डेवर थरारक विजय संग्रहित छायाचित्र
क्रीडा

FIFA World Cup 2026 : मेस्सीचा गोलधडाका कायम! विश्वचषकात लगावला २० वा गोल; गोल्डन बूटच्या शर्यतीत अग्रेसर, अर्जेंटिनाचा कापे व्हर्डेवर थरारक विजय

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा गोलधडाका कायम राहिल्याने गतविजेत्या अर्जेटिनाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कापे व्हडेंचा ३-२ असा पराभव केला.

Swapnil S

मायामी गार्डन्स (एपी) : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा गोलधडाका कायम राहिल्याने गतविजेत्या अर्जेटिनाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कापे व्हडेंचा ३-२ असा पराभव केला. मात्र, अतिरिक्त वेळेपर्यंत चाललेल्या या थरारक सामन्यात अवघ्या ५ लाख लोकसंख्येच्या कापे व्हर्डेने अर्जेटिनाला चांगलेच झुंजवले, मात्र अंतिम क्षणी मिळवलेल्या या विजयामुळे गतविजेत्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

सामन्याच्या २९ व्या मिनिटाला मेस्सीने केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाने १-० अशी आघाडी घेतली होती. मेस्सीचा हा फिफा विश्वचषक स्पर्धेतील २० वा गोल ठरला असून त्याने या यादीत फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेवर दोन गोलची आघाडी घेतली आहे.

मेस्सीने २०२२ च्या विश्वचषक मोहिमेपासून आतापर्यंत सलग आठ विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करण्याचा विक्रम केला आहे. सामन्यात कापे व्हर्डेच्या संघाने १-१ आणि २-२ अशी दोनदा बरोबरी साधली, परंतु अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात मेस्सीने घेतलेल्या कॉर्नर किकवर चेंडू खेळाडूंच्या डोक्याला लागून गोलपोस्टमध्ये गेल्याने अर्जेंटिनाला निर्णायक विजय मिळवता आला. अर्जेटिनाचा पुढील सामना मंगळवारी अटलांटा येथे इजिप्तविरुद्ध होणार आहे. इजिप्तने ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.

आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील अवघ्या ५ लाख २५ हजार लोकसंख्येच्या कापे व्हर्डे या छोट्याशा देशाने या सामन्यात अर्जेटिनाला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करायला लावले. कापे व्हडेच्या सिडनी लोपेस कान्नाल आणि डेरॉय ड्युआर्ट यांनी गोल करत सामन्यात दोनदा बरोबरी साधली आणि दक्षिण फ्लोरिडामधील अर्जेटिनाच्या चाहांना स्तब्ध केले. कान्नालने १०३ व्या मिनिटाला गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझला चकवून उजव्या पायाने शानदार गोल केला आणि सामना २-२ अशा बरोबरीत आणला. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अर्जेंटिनाच्या तिसऱ्या गोलला उत्तर देणे त्यांना जमले नाही. कापे व्हडेचा ४० वर्षीय गोलरक्षक वोझिन्हा याने सामन्यात मेस्सीचे ५ बचाव यांसह एकूण १० उत्कृष्ट बचाव केले.

सामन्यानंतर मेस्सीने सांगितले की, आम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या आणि आम्हाला आमच्या चुका सुधाराव्या लागतील, हा संघ नेहमीच स्पर्धा करतो आणि आम्ही शेवटपर्यंत लढा दिला." मेस्सीचा संघसहकारी रॉड्रिगो दे पॉल याने नमूद केले की, "मेस्सीचा मित्र असणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मैत्री ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असून मी स्वतःला नशीबवान समजतो की मला त्याच्यासोबत हे क्षण अनुभवता आले." संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना अर्जेटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी म्हणाले की, "जेव्हा लोक म्हणतात की कोणताही संघ कमकुवत नसतो, ते आज कापे व्हर्डेने ते सिद्ध करून दाखवले. एक उत्कृष्ट संघ असल्याचे कापे व्हर्डने सिद्ध केले."

केप व्हडेचे प्रशिक्षक बुबिस्टा यांनी सांगितले की, "आम्ही आमच्या देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे. आम्ही जागतिक विजेत्या अर्जेटिना संघाविरुद्ध दोनदा बरोबरी साधली आणि सामना अतिरिक्त वेळेपर्यंत नेला. शेवटच्या क्षणी झालेल्या गोलला आमच्याकडे उत्तर नव्हते. त्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला. आम्हाला आमच्या खेळाडूंचा सार्थ अभिमान आहे आणि आम्ही कापे वार्डे देशाची ओळख जागतिक स्तरावर दाखवून दिली आहे."

मेस्सीची विक्रमी कामगिरी

  • सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करण्याचा पराक्रम

  • विश्वचषकात तब्बल २० गोल

  • दोन वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये (२०२२, २०२६) तब्बल ७ गोल करणारा एकमेव

  • साखळी फेरी ते अंतिम लढत अशा प्रत्येक टप्प्यात गोल करणारा फिफा विश्वचषकातील एकमेव फुटबॉलपटू

  • सध्या गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर, मेस्सीसमोर किलियन एम्बाप्पे, एर्लिंग हालंड आणि इंग्लंडचा हॅरी केन यांचे आव्हान

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आतापर्यंत १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड

Pune : दोन महिला पोलिस करणार होत्या समलैंगिक विवाह; आळंदीत लग्नाची तयारी, पत्रिकाही छापल्या, पण आता विवाह रद्द