संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

मेस्सी भारत दौऱ्यावर येणार?

जगातील दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी दहा वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येणार असून त्याच्या भारत दौऱ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Swapnil S

कोलकाता : जगातील दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी दहा वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येणार असून त्याच्या भारत दौऱ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्जेंटिनाचा हा स्टार खेळाडू डिसेंबरमध्ये आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात कोलकाता येथून करेल. त्यानंतर अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली असा दौरा करेल. यावेळी तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे समजते. सूत्रांकडून वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, मेस्सीच्या दौऱ्याची तयारी झालेली आहे. मुंबईतील वानखडे स्टेडियम बुक केले आहे. दरम्यान, मेस्सीकडून अधिकृत होकाराची वाट पाहिली जात आहे.

मेस्सीच्या दौऱ्याची तयारी झालेली आहे. आम्ही मेस्सीच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहोत. कदाचित त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लवकरच भारत दौऱ्याची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, मेस्स १२ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता कोलकाता येथे उतरेल आणि तो दोन दिवस, एक रात्र थांबेल. १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मेस्सीचा दिवस एका कार्यक्रमाने सुरू होईल. त्यानंतर लेक टाऊन श्रीभूमी, येथे ७० फुटांचा मेस्सीच्य पुतळ्याचे अनावरण होईल.

१३ डिसेंबरच्या संध्याकाळी मेस्सी अहमदाबादला जाणार आहे. तिथे तो एका खासगी कार्यक्रमात सहभागी होईल.

भारतीय फुटबॉल संघाशी संवाद

मुंबईत मेस्सी भारतीय फुटबॉल संघ आणि सुनील छेत्री यांच्याशी संवाद साधणार आहे. ही भेट संघाच्या उपलब्धतेनुसार अवलंबून असेल. १५ डिसेंबरला मेस्सी दिल्लीला जाणार असून तेथे तो पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असून त्यानंतर कोटला स्टेडियम येथे कार्यक्रम होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आजची मतमोजणी रद्द! नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आता २१ डिसेंबरला

Drumstick Pickle : डायबिटीसवाल्यांसाठी बेस्ट! शेवग्याच्या शेंगांचं चटकदार लोणचं; १५ मिनिटांत रेडी...

PCOS ने त्रस्त आहात? 'या' योगासनांनी मिळेल नैसर्गिक आराम

झोपडपट्टी मुक्तीसाठी समूह पुनर्विकासाचा पर्याय

महायुतीच्या गोंधळात निवडणूक आयोगाची भर!