क्रीडा

IPL 2026 : लखनौ-गुजरात आज आमनेसामने

मुकुल चौधरी हा नवा तारा गवसल्यामुळे लखनौ सुपर जायंट्स सध्या चर्चेत असला तरी घरच्या मैदानावरील कामगिरी त्यांच्यासाठी फारशी लाभदायक ठरलेली नाही. त्यातच आता आयपीएलमधील रविवारी घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात त्यांची गाठ गुजरात टायटन्सशी पडणार आहे.

Mayuri Gawade

लखनौ : मुकुल चौधरी हा नवा तारा गवसल्यामुळे लखनौ सुपर जायंट्स सध्या चर्चेत असला तरी घरच्या मैदानावरील कामगिरी त्यांच्यासाठी फारशी लाभदायक ठरलेली नाही. त्यातच आता आयपीएलमधील रविवारी घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात त्यांची गाठ गुजरात टायटन्सशी पडणार आहे.

दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्याना त्यांच्याच मैदानावर धूर चारल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. गुजरातने दिल्ली कॅपिटल्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला, त्यांचा हा यंदाच्या मोसमातील पहिला विजय ठरला. लखनौने सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यावर सरशी साधत सलग दोन विजयांची नोंद केली.

लखनौची कामगिरी सुसाट होत असली तरी एकाना क्रिकेट स्टेडियमवर त्यांच्या विजयी घोडदौडीला नेहमीच ब्रेक लागला आहे. त्यांनी गेल्या मोसमात आठपैकी सहा सामने घरच्या मैदानावर गमावले. त्यामुळेच त्यांची सातव्या क्रमांकावर घसरण झाली होती. या स्टेडियमवर लखनौला २२ सामन्यांत फक्त ९ विजय मिळवता आले आहेत. यंदाच्या मोसमातील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांचा डाव फक्त १४१ धावांत गडगडला होता.

राजस्थानमधून आलेला २१ वर्षांचा मुकुल चौधरी हा नवा फिनिशर लखनौला सापडला आहे. फटक्यांमधील वैविध्यता, अप्रतिम षटकारांचे सादरीकरण तसेच हेलिकॉप्टर शॉटमधील पारंगत असलेल्या मुकुलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्याने २७ चेंडूंत २ चौकार आणि ७षटकारांची आतषबाजी करत लखनौला शेवटच्या चेंडवर विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर आयुष बदोनीचे अर्धशकत केकेआरविरुद्धच्या विजयात मोलाचे ठरले होते.

मिचेल मार्श, आयडेन मार्करम, कर्णधार ऋषभ पंत आणि निकोलस पूरन यांच्यामुळे लखनौची फलंदाजी मजबूत वाटत आहे. मात्र रशिद खान आणि वॉशिंग्टन सुंदर या गुजरातच्या फिरकीपटूंसमोर त्यांची खरी कसोटी लागणार आहे. रशिदने दिल्लीविरुद्ध तीन विकेटस मिळवले.

प्रतिस्पर्धी संघ

लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एडीन मार्करम, अब्दुल समद, आयुष बदोनी, मुकुल चौधरी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आनरिच नॉर्किए, प्रिन्स यादव, मोहसिन खान, दिग्वेश राठी, मणिमरन सिद्धार्थ, अर्जुन तेंडुलकर, नमन तिवारी, मयांक यादव, जॉर्ज लिंडे.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, टॉम बँटन, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया.

सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून

अखेर थेट भेट; अमेरिका-इराणची बैठक सुरू, पहिली फेरी झाली

दुसरीकडे मोक्याच्या पदांवर जाऊन बसणे बंद; महसूल अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केवळ तीन वर्षांसाठी

Pune : भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरण्याऐवजी थेट कार पार्किंगमध्ये; थोडक्यात टळला मोठा अनर्थ, उडाला गोंधळ

प्रत्येक शाळेत आता स्थापन होणार परिवहन समिती; शालेय बसवर निर्बंध, सुरक्षित प्रवासासाठी नवे नियम

जेष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती खालावली; 'ब्रीच कँडी'त उपचार सुरू