PTI
क्रीडा

जिंकण्यासाठी नशिबाची साथही आवश्यक : द्रविड

२०२३मध्ये नशीब आमच्या बाजूने नव्हते, तर २०२४मध्ये आम्ही लकी ठरलो, अशी प्रतिक्रिया भारताचे विश्वविजेते माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केली. द्रविडला यावेळी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

Swapnil S

मुंबई : २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर २०२४च्या टी-२० विश्वचषकापर्यंत आम्हाला संघात कोणतेही धक्कादायक बदल करायचे नव्हते. कधी-कधी तुम्ही ९९ टक्के मेहनत घेता, तेव्हा १ टक्के नशिबाची साथ असणेही आवश्यक असते. २०२३मध्ये नशीब आमच्या बाजूने नव्हते, तर २०२४मध्ये आम्ही लकी ठरलो, अशी प्रतिक्रिया भारताचे विश्वविजेते माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केली. द्रविडला यावेळी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

“२०२३च्या विश्वचषकातील अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा सरस खेळ केला, यात शंका नाही. मात्र तुम्ही सामना पाहिला असेल, तर आपल्या गोलंदाजांनी जवळपास १० वेळा ट्रेव्हिस हेडला चकवले. मात्र एकदाही चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतली नाही किंवा चेंडू स्टम्प्सला लागला नाही. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहूनही अखेरच्या दिवशी आम्ही कमी पडलो. तेच २०२४मध्ये अंतिम फेरीत ३० चेंडूंत ३० धावांचा बचाव करता आला. यामध्ये गोलंदाजांचे कौतुक करावे तितके कमीच, मात्र त्या दिवशी नशीबही आमच्या बाजूने होते,” असे द्रविड म्हणाला.

जेतेपदांची हॅटट्रिक साकारू : जय शहा

जय शहा यांनी आयपीएलपूर्वी रोहितच्या नेतृत्वाखाली बार्बाडोसमध्ये भारतीय संघ तिरंगा फडकावेल, असे भाकीत वर्तवले होते. त्यांचे हे भाकीत खरे ठरले. आता पुरस्कार सोहळ्यातही जय शहा यांनी आणखी एक भाकीत वर्तवले. “भारतीय संघ आता चॅम्पियन्स ट्रॉफी (२०२५) आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद (२०२५) अशा दोन्ही आयसीसी स्पर्धा जिंकून हॅटट्रिक साकारेल,’’ असे शहा म्हणाले. यावेळी टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. तसेच महिलांचा संघ आगामी टी-२० विश्वचषकात जेतेपद मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे जय शहा यांचे भाकीत पुन्हा खरे ठरणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

पुरस्कार विजेत्यांची यादी

  • जीवनगौरव पुरस्कार : राहुल द्रविड

  • सर्वोत्तम क्रिकेटपटू (पुरुष) : रोहित शर्मा

  • सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज : विराट कोहली

  • सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाज : मोहम्मद शमी

  • सर्वोत्तम टी-२० फलंदाज : फिल सॉल्ट

  • सर्वोत्तम टी-२० गोलंदाज : टिम साऊदी

  • सर्वोत्तम कसोटी फलंदाज : यशस्वी जैस्वाल

  • सर्वोत्तम कसोटी गोलंदाज : रविचंद्रन अश्विन

  • सर्वोत्तम फलंदाज (महिला) : स्मृती मानधना

  • सर्वोत्तम गोलंदाज (महिला) : दीप्ती शर्मा

  • सर्वोत्तम क्रीडा व्यवस्थापक : जय शहा

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी