क्रीडा

नॅशनल गेम्स क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कर्णधार जाहीर

गुजरात ऑलिम्पिक संघटनेचेच्या संयुक्त विद्यमाने तसेच गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार

वृत्तसंस्था

अहमदाबाद, गुजरात येथे २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान या कालावधीत रंगणाऱ्या ३६व्या नॅशनल गेम्स २०२२ म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कबड्डी संघ मंगळवारी जाहीर करण्यात आले. अहमदनगरच्या शंकर गदईकडे महाराष्ट्राच्या पुरुष, तर पुण्याच्या स्नेहल शिंदेकडे महाराष्ट्राच्या महिला संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

काही दिवसाच्या सरावानंतर हे अंतिम संघ जाहीर करण्यात आले. भारतीय ऑलिम्पिक व गुजरात ऑलिम्पिक संघटनेचेच्या संयुक्त विद्यमाने तसेच गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ईका एरिना ट्रान्स बंदिस्त क्रीडा संकुल येथे कबड्डीचे सामने खेळवण्यात येणार असून सध्या महाराष्ट्राचे दोन्ही संघ श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे सराव करत आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राची संघ निवड करण्यात आली.

पुरुषांच्या प्रशिक्षकपदाची धुरा प्रशांत चव्हाण वाहणार असून आयुबखान पठाण व्यवस्थापक, तर पुरुषोत्तम प्रभू फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत असतील. त्याचप्रमाणे संजय मोकल महिला संघाला प्रशिक्षण देणार असून मेघाली कोरगांवकर व्यवस्थापिका, तर वंदना कोरडे फिटनेस ट्रेनरची भूमिका बजावतील.

महाराष्ट्राचे संघ

पुरुष : शंकर गदई (कर्णधार), मयूर कदम, अस्लम इनामदार, आकाश शिंदे, किरण मगर, अक्रम शेख, पंकज मोहिते, राहुल खाटीक, अक्षय भोईर, सिद्धेश पिंगळे, अजिंक्य पवार, सचिन पाटील.

महिला : स्नेहल शिंदे (कर्णधार), सोनाली शिंगटे, रेखा सावंत, पूजा शेलार, अंकिता जगताप, पूजा यादव, सायली जाधव, सायली केरिपाळे, सोनाली हेळवी, निकिता लंगोट, मेघा कदम, रक्षा नारकर.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य