क्रीडा

वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

वृत्तसंस्था

हरियाणातील चरखी येथे २१ ते २४ जुलै २ या कालावधीत होणाऱ्या ६९व्या वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रविवारी जाहीर करण्यात आला. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पहिल्यांदाच विजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या अहमदनगर संघाचा संघनायक शंकर गदई याला पहिल्याच वर्षी राज्याचे नेतृत्त्व करण्याचा मान मिळाला.

महाराष्ट्राच्या संघात अहमदनगर, मुंबई शहर, ठाणे या जिल्ह्यांचे दोन-दोन खेळाडू असून मुंबई उपनगर, नाशिक, रत्नागिरी, नांदेड, रायगड, धुळे यांचा प्रत्येकी एक खेळाडू आहे. रायगडच्या मयूर कदमकडे गतवर्षाच्या एका राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव आहे. इतर अकरा खेळाडू अगदी नवखे आहेत. प्रशिक्षक प्रशांत चव्हाण याला २० वर्षांपेक्षा अधिक काळ कबड्डी खेळाचा अनुभव आहे. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. हा संघ अहमदनगर येथे मॅटवर सराव करीत असून हा संघ मंगळवार १९ जुलै रोजी दुपारी मुंबईतील वांद्रे टर्मिनन्स येथून गरीब रथ रेल्वेने स्पर्धेसाठी रवाना होईल. अशी माहिती एका पत्रकाद्वारे राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी सर्व प्रसार माध्यमाना दिली.

महाराष्ट्राचा संघ : शंकर गदई (कर्णधार), राहुल खाटीक(दोन्ही अहमदनगर), अक्षय उगाडे, सिद्धेश पिंगळे (दोन्ही मुंबई शहर), अक्रम शेख (मुंबई उपनगर), अस्लम इनामदार, अक्षय भोईर (दोन्ही ठाणे), आकाश शिंदे (नाशिक), शेखर तटकरे(रत्नागिरी), किरण मगर(नांदेड), मयूर कदम(रायगड), देवेंद्र कदम(धुळे).

प्रशिक्षक : प्रशांत चव्हाण(ठाणे). व्यवस्थापक : आयुब पठाण (नांदेड). फिजिओ ट्रेनर : पुरुषोत्तम प्रभू.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त