क्रीडा

मनू भाकरचा अचूक लक्ष्यवेध, पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक; अन्य नेमबाजांकडून निराशा

Swapnil S

चेटेरॉक्स (फ्रान्स) : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी सपशेल निराशा केली होती. आता पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी मनू भाकर हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठत भारताला पदकाच्या आशा दाखवल्या आहेत. आता रविवारी दुपारी होणाऱ्या अंतिम फेरीत मनू पदकाचे खाते खोलणार का? याकडे तमाम देशवासीयांचे लक्ष लागले आहे.

मनूने पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली असली तरी अन्य नेमबाजांनी मात्र निराशा केली. भारतीय नेमबाजांना पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात तसेच १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

झज्जर येथील २२ वर्षीय मनू भाकरने पात्रता फेरीत ५८० गुण पटकावत तिसरे स्थान पटकावले. हंगेरीच्या वेरोनिका मेजरने ५८२ गुणांसह अग्रस्थान पटकावले. याच प्रकारात भारताची रिदम संगवान ५७३ गुणांसह १५वी आली. एक तास १५ मिनिटे रंगलेल्या या सत्रात मनूभाकर हिने बराच वेळ पूर्णपणे वर्चस्व गाजवले. आता रविवारी नॅशनल शूटिंग सेंटर येथे होणाऱ्या अंतिम फेरीत मनूकडून अशाच कामगिरीची अपेक्षा देशवासीयांना आहे.

भारताने २०१२नंतर नेमबाजीत एकही ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही. मनू हा पदकांचा दुष्काळ संपवेल, अशी आशा चाहत्यांना आहे. २०२१च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पिस्तूलमध्ये झालेल्या बिघाडामुळे मनूला पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. सुवर्णपदकाची दावेदार मानल्या जाणाऱ्या मनूचे आव्हान सुरुवातीलाच संपुष्टात आल्याने तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. पण शनिवारी मनू पूर्ण आत्मविश्वासात दिसत होती. संपूर्णपणे झोकून देत कामगिरी करत तिने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

“आता तिचे अर्धे कामच फत्ते झाले आहे. खरी लढाई रविवारी आहे. आज काय घडले, याचा फारसा विचार कुणीही करत नाही. उद्या जे काही घडणार आहे, ते सर्वात महत्त्वाचे आहे. आम्ही नव्याने सुरुवात करणार आहोत. आता तिला तयारीसाठी काही वेळ मिळणार आहे,” असे मनूचे वैयक्तिक प्रशिक्षक जसपाल राणा यांनी सांगितले.

४४ वेळा लक्ष्याचा वेध घेताना मनूने २७ वेळा अचूकपणे १० गुणांची कमाई केली. सुरुवातीच्या सीरिजमध्ये तिला सात वेळा १० गुण तर तीन वेळा ९ गुण जिंकता आले. पहिल्या आणि दुसऱ्या सिरीजमध्ये तिने ९७ गुण पटकावले.

भारताच्या २१ जणांच्या नेमबाजी चमूतील १७ जण पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. “वाईट सुरुवात केल्याचा फटका सरबज्योतला बसला,” असे समरेश जंगने सांगितले. चौथ्या सीरिजमध्ये सरबज्योतने १००पैकी १०० गुणांची कमाई करत पुनरागमन केले, मात्र नंतर त्याची कामगिरी पुन्हा खालावली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी सपशेल निराशा केली होती. आता पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी मनू भाकर हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठत भारताला पदकाच्या आशा दाखवल्या आहेत. आता रविवारी दुपारी होणाऱ्या अंतिम फेरीत मनू पदकाचे खाते खोलणार का? याकडे तमाम देशवासीयांचे लक्ष लागले आहे.

मनूने पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली असली तरी अन्य नेमबाजांनी मात्र निराशा केली. भारतीय नेमबाजांना पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात तसेच १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

झज्जर येथील २२ वर्षीय मनू भाकरने पात्रता फेरीत ५८० गुण पटकावत तिसरे स्थान पटकावले. हंगेरीच्या वेरोनिका मेजरने ५८२ गुणांसह अग्रस्थान पटकावले. याच प्रकारात भारताची रिदम संगवान ५७३ गुणांसह १५वी आली. एक तास १५ मिनिटे रंगलेल्या या सत्रात मनूभाकर हिने बराच वेळ पूर्णपणे वर्चस्व गाजवले. आता रविवारी नॅशनल शूटिंग सेंटर येथे होणाऱ्या अंतिम फेरीत मनूकडून अशाच कामगिरीची अपेक्षा देशवासीयांना आहे.

भारताने २०१२नंतर नेमबाजीत एकही ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही. मनू हा पदकांचा दुष्काळ संपवेल, अशी आशा चाहत्यांना आहे. २०२१च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पिस्तूलमध्ये झालेल्या बिघाडामुळे मनूला पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. सुवर्णपदकाची दावेदार मानल्या जाणाऱ्या मनूचे आव्हान सुरुवातीलाच संपुष्टात आल्याने तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. पण शनिवारी मनू पूर्ण आत्मविश्वासात दिसत होती. संपूर्णपणे झोकून देत कामगिरी करत तिने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

“आता तिचे अर्धे कामच फत्ते झाले आहे. खरी लढाई रविवारी आहे. आज काय घडले, याचा फारसा विचार कुणीही करत नाही. उद्या जे काही घडणार आहे, ते सर्वात महत्त्वाचे आहे. आम्ही नव्याने सुरुवात करणार आहोत. आता तिला तयारीसाठी काही वेळ मिळणार आहे,” असे मनूचे वैयक्तिक प्रशिक्षक जसपाल राणा यांनी सांगितले.

४४ वेळा लक्ष्याचा वेध घेताना मनूने २७ वेळा अचूकपणे १० गुणांची कमाई केली. सुरुवातीच्या सीरिजमध्ये तिला सात वेळा १० गुण तर तीन वेळा ९ गुण जिंकता आले. पहिल्या आणि दुसऱ्या सिरीजमध्ये तिने ९७ गुण पटकावले.

भारताच्या २१ जणांच्या नेमबाजी चमूतील १७ जण पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. “वाईट सुरुवात केल्याचा फटका सरबज्योतला बसला,” असे समरेश जंगने सांगितले. चौथ्या सीरिजमध्ये सरबज्योतने १००पैकी १०० गुणांची कमाई करत पुनरागमन केले, मात्र नंतर त्याची कामगिरी पुन्हा खालावली.

मनू भाकरची ऐतिहासिक कामगिरी-

  • कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात महिलांची अंतिम फेरी गाठणारी मनू भाकर ही भारताची पहिली महिला नेमबाज ठरली आहे.

  • गेल्या २० वर्षांत वैयक्तिक प्रकारात ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत मजल मारणारी मनू भाकर ही भारताची पहिली महिला नेमबाज ठरली आहे. याआधी सुमा शिरूर हिने २००४च्या ॲॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकाराची अंतिम फेरी गाठली होती.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला