PTI
क्रीडा

मॅकक्युलम इंग्लंडच्या तिन्ही संघांच्या प्रशिक्षकपदी नियुक्त

इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक बँडन मॅकक्युलम आता एकदिवसीय आणि टी-२० संघाचेही प्रशिक्षकपद भूषवणार आहे. ४२ वर्षीय मॅकक्युलम जानेवारी २०२५पासून हे पद स्वीकारणार आहे.

Swapnil S

लंडन : इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक बँडन मॅकक्युलम आता एकदिवसीय आणि टी-२० संघाचेही प्रशिक्षकपद भूषवणार आहे. ४२ वर्षीय मॅकक्युलम जानेवारी २०२५पासून हे पद स्वीकारणार आहे. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तो तिन्ही प्रकारांत इंग्लंडचे प्रशिक्षकपद सांभाळेल.

२०२२मध्ये मॅकक्युलमची कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्याने बॅझबॉलची शैली रुजवत इंग्लंडच्या कसोटी संघाचे रूप पालटले. जुलैमध्ये मॅथ्यू मॉट्स यांची इंग्लंडच्या टी-२० व एकदिवसीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून या प्रकारांत मार्कस ट्रेस्कोथिक हंगामी स्वरूपावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे. डिसेंबर २०२४पर्यंत ट्रेस्कोथिकच मर्यादित षटकांच्या सामन्यांत प्रशिक्षक असेल. त्यानंतर मात्र मॅकक्युलम हे पद स्वीकारेल. जानेवारीत इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीही होणार आहे. त्यामुळे मॅकक्युलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड तिन्ही प्रकारांत कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल.

भारताचे अग्रस्थान कायम

दुबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताने अग्रस्थान कायम राखले आहे. इंग्लंड-श्रीलंका तसेच पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेनंतर ताजी गुणतालिका आयसीसीने मंगळवारी जाहीर केली.

त्यानुसार भारत ९ सामन्यांतील ७४ गुण व ६८.५२ टक्केवारीसह अग्रस्थानी आहे. त्यानंतर अनुक्रमे ऑस्ट्रेलिया (६२.५० टक्के), न्यूझीलंड (५० टक्के), बांगलादेश (४५.८३ टक्के) यांचा क्रमांक लागतो. श्रीलंका पाचव्या, तर इंग्लंड सहाव्या स्थानी आहे. आघाडीचे दोन संघ जूनमध्ये लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी