क्रीडा

'MI न्यूयॉर्क'ची दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी; MLC मधील अंतिम सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडमवर ५ धावांनी मात

न्यूयॉर्क संघाचे मालकी हक्क हे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे मालक नीता अंबानी यांनी विकत घेतले आहेत. त्यामुळे या संघाचे नाव एमआय न्यूयॉर्क असे आहे.

Swapnil S

डल्लास (अमेरिका) : निकोलस पूरनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या एमआय न्यूयॉर्क संघाने रविवारी मध्यरात्री मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) या अमेरिकेतील टी-२० फ्रँचायझी स्पर्धेचे दुसऱ्यांदा विजेतेपद काबिज केले. अंतिम फेरीत त्यांनी गतविजेत्या वॉशिंग्टन फ्रीडम संघावर ५ धावांनी सरशी साधली.

आयपीएलच्या धर्तीवर २०२३पासून अमेरिकेतही सहा संघांमध्ये टी-२० लीग खेळवण्यात येते. त्यापैकी न्यूयॉर्क संघाचे मालकी हक्क हे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे मालक नीता अंबानी यांनी विकत घेतले आहेत. त्यामुळे या संघाचे नाव एमआय न्यूयॉर्क असे आहे. २०२३मध्ये पूरनच्याच नेतृत्वात न्यूयॉर्कने ही स्पर्धा जिंकली होती. तर यावेळी त्यांनी दुसऱ्यांचा चषक उंचावला.

मुख्य म्हणजे न्यूयॉर्क संघ फक्त १० पैकी ३ साखळी सामने जिंकून बाद फेरीसाठी पात्र ठरला होता. तर वॉशिंग्टन, टेक्सास सुपर किंग्ज व सॅन फ्रॅन्सिस्को युनिकॉन्स या संघांनी साखळी फेरीत अनुक्रमे पहिल्या तीन संघांत स्थान मिळवले होते. वॉशिंग्टनने साखळीत १० पैकी ८, तर टेक्सास व सॅन फ्रॅन्सिस्कोने १० पैकी प्रत्येकी ७ सामने जिंकले होते.

मात्र चौथ्या क्रमांकावरील न्यूयॉर्कने एलिमिनेटरमध्ये प्रथम सॅन फ्रॅन्सिस्कोला, मग क्वालिफायर-२मध्ये टेक्सासला व अंतिम फेरीत वॉशिंग्टनला धक्का दिला. अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डीकॉकच्या ४६ चेंडूंतील ७७ धावांच्या खेळीच्या बळावर न्यूयॉर्कने २० षटकांत ७ बाद १८० धावांपर्यंत मजल मारली.

लक्ष्याचा पाठलाग करताना रचिन रवींद्र (७०) व ग्लेन फिलिप्स (नाबाद ४८) यांच्या योगदानानंतरही वॉशिंग्टनला २० षटकांत ५ बाद १७५ धावाच करता आल्या. २२ वर्षीय ऋषील उगरकरने अखेरच्या षटकात १२ धावांचा बचाव करताना कर्णधार ग्लेन मॅक्सवेलचा (१५) बळी मिळवून न्यूयॉर्कचा विजय साकारला. त्यानेच रचिनचाही अडथळा दूर केला होता. अखेर ऋषीललाच सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ट्रेंट बोल्टनेसुद्धा २ बळी मिळवून उत्तम साथ दिली.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल