क्रीडा

कोरोनाग्रस्त मोहम्मद शमी अद्यापही अनफिट

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ याआधीच जाहीर झाला आहे

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियावरील मालिकाविजयानंतही भारतापुढे पेच निर्माण झाला असून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अद्याप कोरोना व्हायरसवर मात न करू शकल्याने चिंता वाढली आहे. शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० मालिका २८ सप्टेंबरपासून सुरू होणार असतानाच यामुळे आता कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ याआधीच जाहीर झाला आहे. शिवाय, दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील या मालिकेसाठी भारतात दाखल झाला आहे.

भारतीय संघाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, "शमी कोरोना व्हायरसमधून बरा झालेला नाही. वैद्यकीय पथक शमीवर लक्ष ठेवून आहे. टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी शमी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आम्हाला आशा आहे.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील वेगवान गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे शमी टीम इंडियात परतला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी शमीचा कोरोना व्हायरस रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि तो तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून बाद झाला.

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेपर्यंत शमी तंदुरुस्त होईल, असे याआधी अपेक्षित होते. शमीला टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले; मात्र, गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर शमीने भारताकडून एकही टी-२० सामना खेळलेला नाही. तरीही शमीने अनुभवाच्या जोरावर राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले.

टी-२० विश्वचषकात खेळण्याबाबतही संभ्रमावस्था

टी-२० विश्वचषकासाठी मोहम्मद शमी भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाऊ शकेल की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मोहम्मद शमी हा विश्वचषकासाठी बीसीसीआयने निवडलेल्या चार स्टँडबाय खेळाडूंपैकी एक आहे.

BMC त सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक; पूर्णकालिक तत्त्वावरील पदासाठी १२ अर्ज दाखल; १० व १२ नोव्हेंबर रोजी होणार मुलाखत

१ ते १९ डिसेंबर या संसदेचे कालावधीत हिवाळी अधिवेशन

एसटीच्या तिकीट महसुलात सरासरी दैनंदिन तूट; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; २७ वर्षांपासून फरार असल्याने विशेष न्यायालयाने दिला झटका

एअर इंडिया विमान अपघात, तुमच्या मुलाचा दोष नाही; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट