mohammed shami  
क्रीडा

गुजरात टायटन्सला मोठा धक्का; मोहम्मद शमी आयपीएल २०२४ मधून बाहेर, कारण...

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे.

Naresh Shende

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल २०२३ मधून बाहेर झाला आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्डकप २०२४ चा थरार संपल्यापासून मोहम्मद शमी भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. शमीच्या डाव्या पायाला दुखापत झालीय. शमीला यासाठी इंग्लंडमध्ये सर्जरी करावी लागणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी याविषयी पीटीआयला माहिती दिलीय.

शमी गुजरात टायटन्सचा मुख्य गोलंदाज आहे. गतवर्षी झालेल्या आयपीएलच्या २०२३ च्या हंगामात तो शमीने सर्वात जास्त विकेट्स घेतल्या होत्या. त्याने १७ सामन्यांमध्ये १८.६१ च्या सरासरीनं २८ विकेट्स घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली होती. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, शमीच्या डाव्या पायला (घोटा) दुखापत झाल्याने तो आयपीएलमधून बाहेर पडणार आहे. शमीला सर्जरी करण्याची आवश्यकता आहे. ही सर्जरी इंग्लंडमध्ये केली जाणार आहे.

वर्ल्डकप २०२३ मध्ये शमीची चमकदार कामगिरी

भारतात झालेल्या क्रिकेट वर्ल्डकप २०२३ मध्ये मोहम्मद शमीने सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. भारताच्या या वेगवान गोलंदाजाने २०२३ च्या वनडे विश्वचषकात फक्त सात सामन्यांमध्ये १०.७१ च्या सरासरीनं २४ विकेट्स घेतल्या होत्या. शमी सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये खेळला नव्हता. तरीही त्याने सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा अप्रतिम कामगिरी केली.

खलबते सुरूच! राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडेच; एकनाथ शिंदे नाराज? गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

राज्य घटनेतून समाजवादी, धर्मनिरपेक्ष शब्द काढण्यास नकार; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या

शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे; विधानसभेतील गटनेतेपदी भास्कर जाधव सुनील प्रभू प्रतोदपदी

लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या वेगवान गोलंदाजांचा बोलबाला; भुवनेश्वरसाठी बंगळुरूची १०.७५ कोटींची बोली, चहरसाठी मुंबईने मोजले ९.२५ कोटी

संभल हिंसाचार : सपा खासदार, आमदारपुत्र आरोपी; ७ एफआयआर नोंदविले; आतापर्यंत २५ जणांना अटक