क्रीडा

मुंबईत क्रीडा महाकुंभला आजपासून झाली सुरुवात; लगोरी, विटी-दांडू, रस्सीखेच या पारंपरिक खेळांनी दणाणणार मैदान

१३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान मुंबईकरांना पाहायला मिळणार पारंपरिक खेळांचा थरार

Krantee V. Kale

मुंबई : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून मुंबईत कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभला बुधवारी कुर्ला येथे जल्लोषात सुरुवात झाली आहे.

कोणत्या खेळांचा थरार?

मल्लखांब, लेझिम, लगोरी, विटी-दांडू , पंजा लढवणे, रस्सीखेच, पावनखिंड दौड, कुस्ती यांसारख्या अनेक पारंपारिक देशी खेळांचा थरार येथे पाहायला मिळणार आहे. १३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान मुंबईकरांना हे पारंपरिक खेळ पाहायला मिळतील.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपली संस्कृती आणि परंपरा जागृत ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. कुर्ला येथील जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मैदान केवळ देशी आणि पारंपरिक खेळांसाठी राखीव करण्यात आले आहे. या मैदानाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान असे नामकरण आणि लोकार्पण यावेळी केले जाणार आहे. क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून १५ हजारांहून जास्त स्पर्धकांनी विविध खेळांसाठी नोंदणी केली आहे.

Mumbai : ७ अभियंता, कर्मचाऱ्यांवर कारवाई; कोरोनाकाळात पत्नीच्या नावे कंत्राटे, ५० हजारांचा दंड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीची शिफारस

न्यायव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाने हरयाणा पोलिसांना फटकारले

Mumbai : डबेवाल्यांची नवी इनिंग, क्लाऊड किचन उभारणार; जुनी सेवा अडचणीत, काळानुसार बदलण्याचा निर्णय

१०० कुटुंबांचे भवितव्य टांगणीला; बनावट मंजुऱ्या, डोंबिवलीतील बिल्डरला अखेर अटक

नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानची पुढची सुनावणी १२ जूनला