Photo : X (@AIRNewsHindi)
क्रीडा

मुरली श्रीशंकरला लांब उडीत विजेतेपद

भारताचा स्टार लांबउडीपटू मुरली श्रीशंकरने रविवारी ७.७५ मीटर लांब उडी मारत पोर्तुगाल येथे झालेल्या जागतिक ॲथलेटीक्स कॉन्टिनेंटल स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा स्टार लांबउडीपटू मुरली श्रीशंकरने रविवारी ७.७५ मीटर लांब उडी मारत पोर्तुगाल येथे झालेल्या जागतिक ॲथलेटीक्स कॉन्टिनेंटल स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली.

आशिया गेम्समध्ये रौप्य पदक विजेता भारतीय खेळाडू मुरली श्रीशंकरने शनिवारी रात्री उशीरा झालेल्या दुसऱ्या फेरीत सर्वोत्तम कामगिरी केली. तिच त्याच्यासाठी फलदायी ठरली.

श्रीशंकरने पहिल्या प्रयत्नात ७.६३ मीटर उडी मारली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ७.७५ मीटर अंतर कापले. ही उडी त्याला विजेतेपद मिळवून देणारी ठरली. स्पर्धेतील ही त्याची सर्वात लांब उडी होती. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ७.६९ मीटर उडी मारली. मात्र त्याचा हा तिसरा प्रयत्न फाऊल ठरवण्यात आला. त्याने शेवटच्या दोन उड्या या ६.१२ मीटर आणि ७.५८ मीटर दूर मारल्या.

पोलंडच्या पिओट्र तार्कोवास्की आणि श्रीशंकर यांच्यात विजेतेपदासाठी स्पर्धा झाली. पिओट्र तार्कोवास्कीने श्रीशंकरच्या ७.७५ मीटरच्या उडीशी बरोबरी केली. मात्र त्याचा दुसरा प्रयत्न ७.५८ मीटर होता. त्याचा फटका त्याला बसला. श्रीशंकरच्या ७.६९ मीटरपेक्षा तो कमी होता. त्यामुळे स्पर्धेत श्रीशंकर विजेता ठरला.

जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या नियमानुसार स्पर्धेदरम्यान दोन स्पर्धकांमध्ये बरोबरी झाल्यास त्याचा दुसरा सर्वात लांब प्रयत्न टाय - ब्रेकरमध्ये वैध ठरवला जातो. त्यानुसार पंचांना भारतीय खेळाडू श्रीशंकरला स्पर्धेतील विजेता म्हणून घोषित केले.

२०२३ मध्ये, केरळच्या या खेळाडूने डायमंड लीग मीटिंगमध्ये तिसरे स्थान मिळवले होते. मात्र, २०२४ च्या हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या दुखापतीमुळे त्याची ऑलिम्पिकची आशा धुळीस मिळाली होती. मात्र आता त्याने शानदार पुनरागमन केले आहे.

सप्टेंबरमध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य श्रीशंकरचे आहे. या स्पर्धेत थेट पात्रतेसाठी त्याला ८.२७ मीटर लांब उडी मारावी लागेल. त्यासाठी त्याला कठोर मेहनत घ्यावी लागेल. आगामी स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूकडून पदकांची अपेक्षा आहे.

शानदार पुनरागमन

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर मोठ्या कालावधीनंतर श्रीशंकरने स्पर्धेत पुनरागमन केले. जुलैच्या सुरुवातीला इंडियन ओपन ॲथलेटिक्समध्ये त्याने ८.०५ मीटर लांब उडी मारली. ऑगस्टमध्ये खेळल्या जाणाऱ्या जागतिक स्पर्धांमध्ये श्रीशंकर सहभागी होणार आहे.

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत जोरदार पाऊस

१२ निरपराधांचा सगळा उमेदीचा काळ जेलमध्ये गेला, महाराष्ट्र ATS च्या 'त्या' अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करणार का? - ओवैसी

2006 Mumbai Local Train Blasts: मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता, HC चा निकाल

“महाराष्ट्रात वाईट अनुभव'' ED च्या कारभारावर सर्वोच्च न्यायालयाचा संताप; सरन्यायाधीश म्हणाले, ''तोंड उघडायला लावू नका''

राज्यात पोलिसांविरोधातील तक्रारींमध्ये वाढ; सहा महिन्यांत ४८७ तक्रारी, केवळ ४५ प्रकरणांचा निकाल