क्रीडा

विविध वयोगटांतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २८ फेब्रुवारीपासून रंगणार

कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात आल्यापासून हंगामी समिती महासंघाचे कामकाज पाहते.

Swapnil S

नवी दिल्ली : पतियाळा येथे २८ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान विविध वयोगटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असे भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) हंगामी समितीने स्पष्ट केले.

कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात आल्यापासून हंगामी समिती महासंघाचे कामकाज पाहते. राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनावरून गेले काही महिने असंख्य गदारोळ सुरू होता. अखेर गुरुवारी समितीने राष्ट्रीय स्पर्धांविषयी घोषणा केली. गतवर्षी फेब्रुवारीत राष्ट्रीय स्पर्धा होणे अपेक्षित होते. मात्र कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे गेल्या वर्षी असंख्य स्पर्धा रद्द करण्यात आल्या.

विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांसारख्या अनुभवी कुस्तीपटूंनी आंदोलने केल्याने युवा कुस्तीपटूंचे नुकसान झाल्याचे मत अनेकांनी नोंदवले होते. त्यामुळे कुस्तीपटूंविरोधातही आंदोलने झाली. अखेर बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील महासंघ बरखास्त करण्यात आल्यानंतर हे प्रकरण काहीसे थंडावले.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन