PTI
क्रीडा

नीरज ९० मीटरचे लक्ष्य साधणार? लुसाने येथे आज डायमंड लीगच्या ११व्या टप्प्यात होणार सहभागी

Swapnil S

Lausanne Diamond League: लुसाने : दोन ऑलिम्पिक पदकविजेता भारताचा भालाफेकपटू पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे. स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या ११व्या टप्प्यात गुरुवारी नीरज सहभागी होणार असून यावेळी तो ९० मीटर अंतराचे लक्ष्य साध्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.

२६ वर्षीय नीरजने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक काबिज केले. तर नुकताच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या चार वर्षांच्या कालावधीत मात्र नीरजला अद्याप एकदाही ९० मीटरहून अधिक अंतरावर भालाफेक करता आली नाही. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिकमधअये ९२.९७ मीटरच्या भालाफेकीसह सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे नीरजवरही दडपण वाढत असून त्याच्यासमोर माडींच्या स्नायूंच्या दुखापतीचेही आव्हान असेल. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत दुखापतीचे भय असल्याने नीरजने चार वेळा फाऊल केला होता.

नीरजने पॅरिसमध्ये ८९.४५ मीटर अंतराची भालाफेकी केली. तर त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर इतकी आहे. २०२२च्या डायमंड लीगमध्ये त्याने इतके अंतर सर केले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून भालाफेकीतील स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे निरजलासुद्धा त्याचा दर्जा आणखी वाढवावा लागेल. २०२२मध्ये डायमंड लीग जिंकणाऱ्या नीरजला २०२३मध्ये दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.

नीरज सध्या चौथ्या स्थानी

यंदा डायमंड लीगच्या अंतिम फेरीस पात्र ठरण्याकरता नीरजला अव्वल ६ खेळाडूंत स्थान मिळवणे गरजेचे आहे. १४ सप्टेंबर रोजी डायमंड लीगचा अखेरचा म्हणजेच १५वा टप्पा होईल. नीरज सध्या चौथ्या स्थानी असून त्याच्या खात्यात ७ गुण आहेत. मे महिन्यात तो दोहा डायमंड लीगमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने दुसरे स्थान मिळवले. आता गुरुवारी नीरजपुढे पुन्हा एकदा अर्शद, जॅकूब वॅडेलच, पीटर्स अँडरसन यांचे कडवे आव्हान असेल.

ऑलिम्पिकनंतर मी थेट स्वित्झर्लंड गाठण्याचे ठरवले. गेल्या काही दिवसांपासून माझे शरीर उत्तम लयीत आहे. पुढील एक महिना फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात मी डॉक्टरांची भेट घेऊन दुखापतीवर उपचार घेत राहीन. डायमंड लीगची अंतिम फेरी झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा माझा विचार आहे.
- नीरज चोप्रा

> वेळ : रात्री १२.१५ वा.

> थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी-जिओ सिनेमा

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा