क्रीडा

नीरजकडून संघटनेच्या निर्णयाचे स्वागत; लवकरच ९० मीटरचे लक्ष्य गाठण्याची खात्री

“पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मी ९० मीटरचे अंतर गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. मला माझ्या क्षमतेवर व मेहनतीवर विश्वास आहे. माझे शरीर सध्या उत्तम लयीत असून तंदुरुस्तीवर मी अधिक लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे यावेळी ९० मीटरचे अंतर गाठेनच,” असे नीरज म्हणाला.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा तारांकित भालेफेकपटू नीरजने जागतिक ॲथलेटिक्स संघटनेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. “टेनिस, फुटबॉल, क्रिकेट यांसारख्या खेळांत जितका पैसा आहे, तितका ॲथलेटिक्समध्ये नाही. मात्र संघटनेच्या या निर्णयामुळे ॲथलिट‌्सचे मनोबल उंचावले जाईल. अन्य क्रीडा प्रकारांनीसुद्धा याद्वारे प्रेरणा घेत पदकविजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिकही द्यावे, जेणेकरून खेळाडूंचे भविष्य सुरक्षित होईल,” असे नीरज म्हणाला.

“पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मी ९० मीटरचे अंतर गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. मला माझ्या क्षमतेवर व मेहनतीवर विश्वास आहे. माझे शरीर सध्या उत्तम लयीत असून तंदुरुस्तीवर मी अधिक लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे यावेळी ९० मीटरचे अंतर गाठेनच,” असे नीरज म्हणाला. किशोर जेनासुद्धा ९० मीटरचे अंतर गाठू शकतो, असेही नीरजने सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज व किशोर या भारताच्याच दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण व रौप्यपदक काबिज केले होते. नीरजने २०२२च्या डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर अंतरावर भालाफेक केली होती. यंदा त्याचे ९० मीटरचे अंतर गाठण्याचे लक्ष्य आहे.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली