टॉम लॅथम-डेवॉन कॉन्वेची त्रिशतकी सलामी Photo- X
क्रीडा

न्यूझीलंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिका: टॉम लॅथम-डेवॉन कॉन्वेची त्रिशतकी सलामी

कर्णधार टॉम लॅथम (२४६ चेंडूंत १३७ धावा) आणि डेवॉन कॉन्वे (२७९ चेंडूंत नाबाद १७८) या डावखुऱ्या फलंदाजांच्या जोडीने गुरुवारी विक्रमी त्रिशतकी भागीदारी रचली.

Swapnil S

ख्राईस्टचर्च : कर्णधार टॉम लॅथम (२४६ चेंडूंत १३७ धावा) आणि डेवॉन कॉन्वे (२७९ चेंडूंत नाबाद १७८) या डावखुऱ्या फलंदाजांच्या जोडीने गुरुवारी विक्रमी त्रिशतकी भागीदारी रचली. त्यामुळे न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ९० षटकांत तब्बल १ बाद ३३४ धावांपर्यंत मजल मारली.

उभय संघांतील या तीन लढतींच्या मालिकेत न्यूझीलंड १-० अशी आघाडीवर आहे. पहिली लढत विंडीजने झुंज देत अनिर्णित राखली. मात्र दुसऱ्या लढतीत किवी संघाने बाजी मारली. आता तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लॅथम व कॉन्वे यांच्यासमोर विंडीजच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. लॅथमने १५ चौकार व १ षटकारासह १५वे कसोटी शतक साकारले, तर कॉन्वेने २५ चौकारांसह सहावे शतक झळकावले. या दोघांनी ८६.४ षटकांत ३२३ धावांची सलामी नोंदवली.

न्यूझीलंडच्या कसोटी इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली. १९७२मध्ये ग्लेन टर्नर व टेरी जर्विस यांनी विंडीजविरुद्धच ३८७ धावांची सलामी नोंदवली होती. केमार रोचने लॅथमचा अडसर दूर करून विंडीजला ८७व्या षटकात पहिला बळी मिळवून दिला.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल