क्रीडा

दुर्मिळ आजारांबद्दल जागरूकता, वाढवण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन

७००० मीटर या मॅरेथॉनचा प्राथमिक उद्देश दुर्मिळ आजारांबद्दल जागरूकता वाढवणे आणि रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय संसाधने उपलब्ध करून देणे

Swapnil S

मुंबई : ऑर्गनायझेशन फॉर रेअर डिसीजेस इंडिया (ओआरडीआय) २५ फेब्रुवारी रोजी भारतातील १४ शहरांमध्ये ‘रेस फॉर ७’ या वार्षिक प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. ७००० मीटर या मॅरेथॉनचा प्राथमिक उद्देश दुर्मिळ आजारांबद्दल जागरूकता वाढवणे आणि रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय संसाधने उपलब्ध करून देणे तसेच या प्रक्रियेत त्यांना सक्षम बनवणे हा आहे.

या वर्षी २०,०००हून अधिक धावपटूंचा सहभाग या स्पर्धेत अपेक्षित आहे. बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, कोची, म्हैसूर, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम, नवी दिल्ली, कोलकाता या शहरांमध्ये २५ फेब्रुवारी रोजी ही मॅरेथॉन नियोजित केली आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी ९३२४०६६६०० या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन