क्रीडा

भारताचे पॅकअप; सीरियाकडूनही पराभव; आशिया चषक फुटबॉल स्पर्धा

मंगळवारी झालेल्या ब-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात सीरियाने भारताचा १-० असा पराभव केला. त्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. उमर खरिबीनने ७६व्या मिनिटाला लढतीतील एकमेव गोल नोंदवला.

Swapnil S

अल खोर (कतार) : सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाला आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मंगळवारी झालेल्या ब-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात सीरियाने भारताचा १-० असा पराभव केला. त्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. उमर खरिबीनने ७६व्या मिनिटाला लढतीतील एकमेव गोल नोंदवला.

पाचव्यांदा या स्पर्धेत खेळणाऱ्या भारताने १९६४मध्ये आशिया चषकाचे उपविजेतेपद मिळवले होते. मात्र त्यानंतर त्यांना एकदाही (१९८४, २०११, २०१९, २०२४) बाद फेरी गाठता आलेली नाही. आता फेब्रुवारी महिन्यात फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील दुसऱ्या टप्प्यात भारतीय संघ चमकदार कामगिरी करेल, अशी आशा आहे. २०२३मध्ये भारताने सॅफ चषक तसेच आंतरखंडीय चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. मात्र आशिया चषकात ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, सीरियापुढे त्यांचा निभाव लागला नाही. भारताला या स्पर्धेत एकही गोल करता आला नाही. त्यामुळे ३९ वर्षीय छेत्री आणि प्रशिक्षक इगॉर स्टिमॅच तसेच छेत्री आता फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीकडे अधिक लक्ष केंद्रीत करून चुकांची पुनरावृत्ती टाळतील, अशी अपेक्षा आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक