ANI/X
क्रीडा

Paralympic Games Paris 2024: सुहासची रौप्य, निथ्याची कांस्यकमाई

बॅडमिंटनमध्ये भारताची पदक लयलूट कायम असून यामध्ये सुहास यथिराज आणि निथ्या सिवन यांच्या अनुक्रमे रौप्य व कांस्यकमाईची भर पडली आहे.

Swapnil S

पॅरिस : बॅडमिंटनमध्ये भारताची पदक लयलूट कायम असून यामध्ये सुहास यथिराज आणि निथ्या सिवन यांच्या अनुक्रमे रौप्य व कांस्यकमाईची भर पडली आहे.

पुरुष एकेरीतील एसएल ४ प्रकारात सुहासला फ्रान्सच्या लुकास माझूरकडून ९-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. मात्र सलग दोन पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा तो भारताचा पहिला बॅडमिंटनपटू ठरला. ४१ वर्षीय सुहासने २०२०च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्येही रौप्यपदकच जिंकले होते.

महिला एकेरीतील एसएच ६ प्रकारात निथ्याने पहिल्याच पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. १९ वर्षीय निथ्याने इंडोनेशियाच्या रिना मार्टिनाला २१-१४, २१-६ असे पराभूत केले. एसएच ६ प्रकारात उंचीने कमी असलेले बॅडमिंटनपटू खेळतात.

यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने बॅडमिंटनमध्ये आतापर्यंत ५ पदके कमावली आहेत. यामध्ये नितेश कुमार (सुवर्ण), सुहास यथिराज, तुलसिमती मुरुगेसन (रौप्य), मनीषा रामदास, निथ्या सिवन (कांस्य) यांचा समावेश आहे.

ई-२० इंधनाचा वापर सुरक्षितच; वाहन विम्याच्या वैधतेवर परिणाम होणार नसल्याचा सरकारचा दावा

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा