AFP
क्रीडा

Paris 2024 Olympics: भजनची आगेकूच; अंकिता गारद

Swapnil S

पॅरिस : तिरंदाजीच्या महिला एकेरी फेऱ्यांना मंगळवारी प्रारंभ झाला. यामध्ये राऊंड ऑफ ३२ म्हणजेच पहिल्या फेरीत भारताच्या भजन कौरने दमदार विजय नोंदवला, तर अंकिता भकतला गाशा गुंडाळावा लागला.

भजनने पोलंडच्या वायोलेटा मैसूरला ६-० असे नामोहरम केले. महिलांच्या सांघिक विभागात भारताला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी एकेरीत भजनने चांगली कामगिरी केली. त्यापूर्वी भजनने, राऊंड ऑफ ६४ फेरीत इंडोनेशियाच्या सैफिया नुराला ७-३ असे पराभूत केले होते. अंकिताला मात्र पोलंडच्या मैसूरकडून राऊंड ऑफ ६४मध्ये २-४ असा पराभव पत्करावा लागला. मग भारताच्या भजनने मैसूरला नमवून तिचे आव्हान संपुष्टात आणले. पुरुषांच्या एकेरी फेरीला बुधवारपासून प्रारंभ होईल.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला