क्रीडा

Swapnil Kusale: मध्य रेल्वेकडून गिफ्ट! कांस्यपदक विजेत्या स्वप्निल कुसळेचे केले प्रमोशन

Paris Olympic 2024: स्वप्निलला मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील मुंबईच्या स्पोर्ट‌्स सेलमध्ये विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

Swapnil S

Bronze medal winner Swapnil Kusale: मुंबई : मध्य रेल्वेमध्ये कार्यरत (Indian Railways) असलेल्या स्वप्निल कुसळे याने पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. या कामगिरीमुळे स्वप्निलला मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील मुंबईच्या स्पोर्ट‌्स सेलमध्ये विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील स्वप्निल कुसळे भारतीय रेल्वेमध्ये २०१५ साली मध्य रेल्वेच्या पुणे विभागात वाणिज्यिक तिकीट लिपिक म्हणून रूजू झाला. त्याने २०२३ मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा, २०२२ मध्ये बाकू येथील विश्वचषक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले आहे. २०२१ मध्ये नवी दिल्ली तसेच त्याने २०१५ ते २०२३ या कालावधीत विविध नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत. तर, स्वप्निल कुसळेने पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात तिसरा क्रमांक पटकावून कांस्यपदकाची कमाई केली. नेमबाजीच्या या प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. त्यांच्या या अपवादात्मक कामगिरीची दखल घेऊन, रेल्वे मंडळाने कुसळे यांना गट क मधून गट ब राजपत्रित संवर्गात पदोन्नती मंजूर केली आहे.

भारतीय रेल्वेने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे आणि त्यांना सरावासाठी कामाच्या व्यापातून अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या समर्पण आणि मेहनतीमुळे भारतीय रेल्वे आणि देशाला मोठा सन्मान मिळाला आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास