ANI
क्रीडा

IOA अध्यक्ष पीटी उषा यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केले विनेश फोगटचे सांत्वन

Swapnil S

नवी दिल्ली : अंतिम फेरीत पोहोचूनही पदक जिंकता न आल्याचे दु:ख विनेश फोगटला पचवता आले नाही. ५० किलोपेक्षा जास्त वजन भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. हा निर्णय ऐकताच विनेशला त्याचा मोठा धक्का तिला बसला. बेशुद्ध झाल्याने विनेश फोगट हिला पॅरिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांनी बुधवारी संध्याकाळी रुग्णालयात जाऊन विनेशच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच तिचे सांत्वन केले. विनेशनेही आपण शूर असल्याचे दाखवले, पण चेहऱ्यावर हास्य असतानाही तिला निराशा लपवता आली नाही.

विनेश फोगटच्या अपात्रतेबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा म्हणाल्या की, “आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. मी जागतिक कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनाही भेटणार आहोत. विनेश ही गोल्ड आहे. ती लवकरच या परिस्थितीतून सावरेल, अशी आशा आहे.”

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला