X
क्रीडा

Paris Olympics 2024: धावण्याची शर्यतीत किरण पहल सातव्या स्थानी

Kiran Pahal: २४ वर्षीय किरणने ४०० मीटर शर्यतीत ५२.५१ सेकंद वेळ नोंदवली.

Swapnil S

पॅरिस : महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या किरण पहलला सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. आता मंगळवारी ती रेपेचेज फेरीत सहभागी होणार असून त्याद्वारे तिला पुन्हा उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची संधी आहे.

२४ वर्षीय किरणने ४०० मीटर शर्यतीत ५२.५१ सेकंद वेळ नोंदवली.

डॉमिनिकाच्या मेरीने ४९.४२ सेकंदांसह अग्रस्थान मिळवले. एकूण सहा फेऱ्यांत झालेल्या या शर्यतीत आघाडीचे ३ स्पर्धक उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित सर्वांमध्ये मंगळवारी रेपेचेज फेरी होणार असून यांतील आघाडीच्या चौघांना उपांत्य फेरी गाठता येईल. दरम्यान, गोळाफेकीत भारताच्या तजिंदरपाल सिंग तूरला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात