मेलबर्न : पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला आगामी भारत आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. ॲशेस मालिका डोळ्यासमोर ठेवून कमिन्स दुखापतीतून सावरण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे सांगण्यात आले.
ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १ ऑक्टोबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारताविरुद्ध ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान एकदिवसीय मालिका होणार आहे. तर २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. २१ नोव्हेंबरपासून इंग्लंडविरुद्ध पर्थ येथे ॲशेस मालिकेला सुरुवात होणार आहे.
कमिन्सला भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघात संधी दिली जाणार नाही. तो दुखापतीतून सावरण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ॲशेस मालिका डोळ्यासमोर ठेवून तो पुनरागमन करण्याची शक्यता असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान स्टार्कने निवृत्ती स्विकारली असून कमिन्स दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.