क्रीडा

खेलो इंडिया यूथ गेम्सच्या खो-खो स्पर्धेचे कर्णधारपद महाराष्ट्राच्या या खेळाडुंकडे

२१ वर्षांखालील खो-खो प्रकारातील स्पर्धांसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर

वृत्तसंस्था

पंचकुला (हरयाणा) येथे सुरू असलेल्या चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्ससाठी (२१ वर्षांखालील) खो-खो प्रकारातील स्पर्धांसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहेत. गुरुवारपासून खो-खोच्या सामन्यांना प्रारंभ होणार असून यासाठी सोलापूरच्या रामजी कश्यपकडे महाराष्ट्राच्या मुलांचे, तर उस्मानाबादच्या जान्हवी पेठेकडे महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे संघ

मुले : रामजी कश्यप (कर्णधार), रोहन कोरे, ऋषिकेश शिंदे, अर्णव पाटणकर, शुभम थोरात, आदित्य कुदळे, चंदू चावरे, आकाश तोंगरे, किरण वसावे, नरेंद्र कातकडे, सुफियान शेख, कोमल महाजन.

मुली : जान्हवी पेठे (कर्णधार), दीपाली राठोड, श्वेता वाघ, संपदा मोरे, अंकिता लोहार, कौशल्या पवार, गौरी शिंदे, अश्विनी शिंदे, श्रेया पाटील, प्रीती काळे, वृषाली भोये, मयुरी पवार.

दुष्काळाचा तिजोरीवर भार! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारची कर्ज उभारण्याची तयारी

महाराष्ट्र SIR : तातडीची सुनावणी नाही, पुढील तारीख २२ ऑक्टोबर

...तर वाहतूक दंड वीज बिलात समाविष्ट; सुप्रीम कोर्टाची सूचना

काँग्रेसची देशभर निदर्शने; आग्र्यात ज्ञानेश कुमारांच्या घराला फासले काळे

BEST चे धाबे दणाणले; धारावीत वीजपुरवठ्यासाठी बड्या कंपनीचा अर्ज