क्रीडा

डब्ल्यूएसीए मैदानावरील सरावामुळे आपला उद्देश पूर्ण; मॉर्ने मॉर्कल, अभिषेक नायर यांचे प्रतिपादन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी डब्ल्यूएसीए मैदानावरच्या मधल्या खेळपट्टीवरील संघाच्या सरावामुळे आपला उद्देश पूर्ण झाला असल्याचे भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल आणि अभिषेक नायर म्हणाले.

Swapnil S

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी डब्ल्यूएसीए मैदानावरच्या मधल्या खेळपट्टीवरील संघाच्या सरावामुळे आपला उद्देश पूर्ण झाला असल्याचे भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल आणि अभिषेक नायर म्हणाले.

दुसऱ्या दिवशी आमच्या गोलंदाजांनी अधिक कष्ट घेतले. त्यांनी प्रत्येकी १५ षटके टाकली. जसप्रीत बुमराहने १८ षटके गोलंदाजी केली. अन्य काही गोलंदाजांनीही १८ षटके फेकली. प्रशिक्षणादरम्यान गोलंदाजांच्या कामगिरीचे विश्लेषण करताना, भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले.

पुढे मॉर्केल म्हणाले की, जसप्रीत बुमराह हा वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व अशा दुहेरी भूमिकेत असेल. अशावेळी मोहम्मद सिराजने नवीन आणि जुन्या दोन्ही चेंडूंवर गोलंदाजी करून त्याला आवश्यक साथ देणे अपेक्षित आहे. २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिराज सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. सिराज हा एक दिग्गज गोलंदाज आहे. तो आक्रमक आहे. तो या दौऱ्यात कशी कामगिरी करतो हे पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याचे मॉर्केल म्हणाले.

वातावरणाशी जुळवून घेण्याची कल्पना

डब्ल्यूएसीए मैदानावरील सरावाच्या तीन दिवसांतून आम्हाला काय हवे आहे यावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत चर्चा झाली होती. येथील परिस्थिती समजून घेण्यासाठी, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी येथे काही वेळ द्या अशी आमची कल्पना होती, असे नायर बीसीसीआयच्या व्हिडीओमध्ये म्हणाले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?