एक्स
क्रीडा

प्रज्नेश गुणेश्वरनची टेनिसमधून निवृत्ती

आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेता भारताचा स्टार टेनिसपटू प्रज्नेश गुणेश्वरनने शुक्रवारी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर पोस्ट करत गुणेश्वरनने टेनिसमधील निवृत्तीची घोषणा केली.

Swapnil S

चेन्नई : आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेता भारताचा स्टार टेनिसपटू प्रज्नेश गुणेश्वरनने शुक्रवारी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर पोस्ट करत गुणेश्वरनने टेनिसमधील निवृत्तीची घोषणा केली.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये प्रज्नेश म्हणाला की, माझे रॅकेट आता हँगअप करत आहे. आज मी स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारत आहे. तीन दशकांहून अधिक काळ हा खेळ माझा सर्वात मोठा शिक्षक आणि माझा सर्वात विश्वासू साथीदार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत या खेळातील माझा प्रवास असाधारण राहिला आहे.

गुनेश्वरनने टॉप-२० खेळाडूविरुद्धचा सर्वात मोठा विजय २०१९ मध्ये मिळ‌वला. त्याने इंडियन वेल्स मास्टर्सच्या दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या निकोलोज बॅसिलॅश्विलीचा पराभव केला होता.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी