राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी संगकारा; राहुल द्रविड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 
क्रीडा

राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी संगकारा

श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा यांची आयपीएलच्या आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. राहुल द्रविड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Swapnil S

नवी दिल्ली : श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा यांची आयपीएलच्या आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. राहुल द्रविड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

द्रविड यांनी यंदा ऑगस्टमध्ये राजस्थान रॉयल्सची साथ सोडली होती. त्यानंतर सोमवारी राजस्थान रॉयल्सने संगकारा यांच्या नावाची घोषणा केली.

राजस्थान रॉयल्सने एका निवेदनात म्हटले आहे की, कुमार संगकारा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात येत आहे. त्याच्या पुनरागमनाचा आम्हाला आनंद आहे.

१६ डिसेंबरला अबू धाबी येथे होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्सने सात खेळाडूंना रिलीज केले आहे, ज्यात तीन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या कार्यकाळाचा शेवट काहीसा अचानक झाला. यंदाच्या हंगामातील खराब कामगिरीनंतर त्यांनी पद सोडले. त्यामुळे आता संगकारा पुन्हा राजस्थानच्या संघाला क्रिकेटचे धडे देणार आहे.

मुंबईतील CNG संकट अखेर टळले! गॅस पुरवठा पुन्हा सुरू, वाहनचालकांना दिलासा

Delhi Car Blast : दिल्ली स्फोटाचे मुंबई कनेक्शन; ३ जण ताब्यात, दिल्लीत कसून चौकशी सुरू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : मुंबईकरांसाठी खुशखबर! आता घरांची किंमत परवडणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

"आज परत कोणीतरी गावी जाणार..."; आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका

छत्तीसगड : सुरक्षा दलांवर मोठे हल्ले घडवणारा कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा ठार; सरकारने ५ कोटींचे ठेवले होते बक्षीस