क्रीडा

रणजी ट्रॉफीत चमकलेले चंद्रकांत पंडित यांची केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

मुंबईच्या या दुक्कलीकडून केकेआरला आयपीएल २०२३ च्या हंगामात चमकदार कामगिरीच्या अपेक्षा असणार आहेत.

वृत्तसंस्था

स्थानिक क्रिकेटमध्ये कमालीचे यशस्वी ठरलेले चंद्रकांत पंडित यांची आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

केकेआरचे नेतृत्व मुंबईच्या श्रेयस अय्यरकडे आहे. आता मुंबईचेच माजी खेळाडू चंद्रकांत पंडित यांना मुख्य प्रशिक्षक करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईच्या या दुक्कलीकडून केकेआरला आयपीएल २०२३ च्या हंगामात चमकदार कामगिरीच्या अपेक्षा असणार आहेत. यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत अंतिम सामन्यात मुंबईला पराभूत करत मध्य प्रदेशने रणजी ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यात चंद्रकांत पंडित यांचा प्रशिक्षक म्हणून मोठा वाटा आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी यापूर्वी ब्रँडन मॅक्युलम यांच्यावर होती. मात्र त्यांची इंग्लंडच्या कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. आता या जागेवर पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंडित हे भारतीय माजी यष्टीरक्षक आहेत. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. ते ज्या संघाचे प्रशिक्षक होतात तो संघ रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारतोच, अशी त्यांनी मिळविली आहे. पंडित हे प्रशिक्षक असतानाच विदर्भाने रणजी ट्रॉफीवर नाव कोरत इतिहास रचला. त्यानंतर मध्य प्रदेशला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यातही त्यांचा महत्वाचा वाटा होता. आता पंडित हे आयपीएलसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपला करिश्मा कसा दाखवितात, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत