क्रीडा

कारकीर्दीला नव्याने प्रारंभ करण्यास सज्ज - पंत

भारताचा २६ वर्षीय डावखुरा फलंदाज ऋषभ पंत आगामी आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या सराव शिबिरात दाखल झाला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा २६ वर्षीय डावखुरा फलंदाज ऋषभ पंत आगामी आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या सराव शिबिरात दाखल झाला आहे. यावेळी पंतने पुन्हा एकदा जणू कारकीर्दीला सुरुवात करणार आहे, पदार्पणासाठी सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीने ट्विटरवर बुधवारी पंत सराव करतानाची चित्रफीत पोस्ट केली.

डिसेंबर २०२२मध्ये पंतचा अपघात झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर होता. मात्र बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली पंतने १४ महिने तंदुरुस्तीवर मेहनत घेतली. पंत आता आयपीएलद्वारे स्पर्धात्मक क्रिकेटकडे वळणार आहे. फलंदाजी करण्यास तो पूर्णपणे तयार आहे. मात्र तो यष्टिरक्षण करू शकेल की नाही, याबाबत साशंका होती. अखेर बीसीसीआयने मंगळवारी याविषयी माहिती देत पंत यष्टिरक्षणासाठीही तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले.

“कारकीर्दीला नव्याने सुरुवात करण्यासाठी मी आतुर आहे. मी जणू पदार्पणच करणार आहे, असे वाटत आहे. गेल्या १ ते दीड वर्षांचा काळ आव्हानात्मक होता. यादरम्यान कुटुंबीय, बीसीसीआय तसेच भारतीय संघातील माझे सर्वच मित्र खंबीरपणे पाठीशी उभे होते. अपघातातून सावरत पुनरागमन करणे नक्कीच एक चमत्कार आहे,” असे पंत म्हणाला. २२ मार्चपासून आयपीएलला प्रारंभ होईल.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत